Sunday, 23 December 2018

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतऱ्यासाठी लढे उभे केले....

अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतऱ्यासाठी लढे उभे केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी शेतमजूरांसाठी चळवळी केल्या. कापसाच्‍या शेतकऱ्यासाठी लढा उभा केला. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळावा म्हणून चळवळ केली. रोजगार हमीच्या मजूरांसाठी लढा उभा केला. शासनाला वास्तव स्वरूप दाखवून देवून न्याय हक्कासाठी चळवळ केली.महामंडळाकडून घेतलेले मागासवर्गियांचे कर्ज माफ करावे म्हणून लढा उभा केला. शासनाला कर्ज माफ करायला भाग पाडले. मेडीकल आणि इंजिनियरींगच्या विद्यार्थाची वाढलेली फी अन्यायकारक आहे म्हणून शासनाला आंदोलनातून इशारा दिला. लढा उभा केला. वेगळया विदर्भाला समर्थन करून वेगळया विदर्भाच्या मुद्याला चळवळीचे प्राप्त झाले. वेगळया विदर्भाच्या प्रश्नावर निवडणूका सुध्दा लढले.स्त्री मूक्ती परिषदांचे आयोजन करून सामाजीक भान जागरूक केले.इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
बहूजन समाजासाठी लढे उभे केले.मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर दौरे केले. बहुजनामधे जागृती केली. ओ बी सी विद्यार्थाना स्कॉलरशिप मिळावी म्हणून लढा उभा केला. यशस्वी केला. ओ बी सी हक्क परिषदांचे आयोजन करूण ओबीसी मधे हक्काबद्दलची जाणिव निर्माण करण्याचे महत्तम कार्य साध्य केले. पोटाविरोधी परिषदांचे आयोजन करून अन्यायी कायद्याचे स्वरूप शासनासमोर मांडून पोटा रद्द करण्याची पाश्र्वभूमी तयार केली. सच्चर समितीचा अहवाल लागु करावा म्हणून महारष्ट्रभर परिषदांचे आयोजन केले. जनमत जागृत केले. दरबन येथील वंशवाद विरोधी परिषदेमधे नेतृत्व केले.


No comments:

Post a Comment