आंबेडकरी बाणा (Bhimsainik)
Saturday, 29 December 2018
Sunday, 23 December 2018
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतऱ्यासाठी लढे उभे केले....
अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शेतऱ्यासाठी लढे उभे केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी शेतमजूरांसाठी चळवळी केल्या. कापसाच्या शेतकऱ्यासाठी लढा उभा केला. शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळावा म्हणून चळवळ केली. रोजगार हमीच्या मजूरांसाठी लढा उभा केला. शासनाला वास्तव स्वरूप दाखवून देवून न्याय हक्कासाठी चळवळ केली.महामंडळाकडून घेतलेले मागासवर्गियांचे कर्ज माफ करावे म्हणून लढा उभा केला. शासनाला कर्ज माफ करायला भाग पाडले. मेडीकल आणि इंजिनियरींगच्या विद्यार्थाची वाढलेली फी अन्यायकारक आहे म्हणून शासनाला आंदोलनातून इशारा दिला. लढा उभा केला. वेगळया विदर्भाला समर्थन करून वेगळया विदर्भाच्या मुद्याला चळवळीचे प्राप्त झाले. वेगळया विदर्भाच्या प्रश्नावर निवडणूका सुध्दा लढले.स्त्री मूक्ती परिषदांचे आयोजन करून सामाजीक भान जागरूक केले.इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला.
बहूजन समाजासाठी लढे उभे केले.मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर दौरे केले. बहुजनामधे जागृती केली. ओ बी सी विद्यार्थाना स्कॉलरशिप मिळावी म्हणून लढा उभा केला. यशस्वी केला. ओ बी सी हक्क परिषदांचे आयोजन करूण ओबीसी मधे हक्काबद्दलची जाणिव निर्माण करण्याचे महत्तम कार्य साध्य केले. पोटाविरोधी परिषदांचे आयोजन करून अन्यायी कायद्याचे स्वरूप शासनासमोर मांडून पोटा रद्द करण्याची पाश्र्वभूमी तयार केली. सच्चर समितीचा अहवाल लागु करावा म्हणून महारष्ट्रभर परिषदांचे आयोजन केले. जनमत जागृत केले. दरबन येथील वंशवाद विरोधी परिषदेमधे नेतृत्व केले.

Monday, 17 December 2018
ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांचा लढवय्या कार्यकर्ता अमित भाऊ भुईगळ
आज भारिप बहुजन महासंघाचे महासचिव अमित भाऊ भुईगळ यांचा वाढदिवस म्हणून त्यांच्याविषयी थोडेसे लिहितोय, जिथं गटा-तटात विखुरलेले आंबेडकरी कार्यकर्ते आहेत तेथे प्रामाणिक, निष्ठावन्त, स्वाभिमानी, कसलाही गर्व नसलेल्या कार्यकर्त्यांची कमी असते मात्र काही कार्यकर्ते याला अपवाद आहेत व त्यातील प्रमुख एक नाव म्हणजे भीमयोद्धा अमित भाऊ भुईगळ.....
आद. बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघ या पक्षात विद्यार्थी दशेपासून सामान्य जनतेचे, गोर-गरिबांचे काम करीत अमित भुईगळ हे नगर सेवक झाले आणि त्या संविधानिक पदाचा फायदा आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी करत व तेथील नागरिकांच्या समस्या सोडवत ते मतदारांच्या विश्वसाला पात्र ठरले....
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक पुणे करारा विषयी "पुणे करार धिक्कार परिषद" घेणाऱ्या व नेहमीच आंबेडकरी घरण्या विषयी विकृत लिखाण करणाऱ्या वामन मेश्रामला चोप देऊन ती परिषद उधळून लावण्याचे काम ही अमित भुईगळ यांनी केले.
मागे रत्नाकर गायकवाड या विदुषकाने समस्त आंबेडकरी जनतेची ऐतिहासिक वास्तू असलेली जी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या हाताने उभा केली होती त्या वास्तूवर रत्नाकर गायकवाड या आंबेडकरी चळवळीतील विदूषकाने डोळा ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मालकीचा बुद्धभूषण प्रिंटिग प्रेस नष्ट केला. ऐतिहासिक मशीन तोडल्या, महत्वाची कागदपत्रे चोरली वस्तूंची लूट केली हे सर्व आंबेडकर भवन बिल्डरांच्या घशात घालण्यासाठीच उध्वस्त करण्यात आले होते मात्र आंबेडकर भवन पाडल्यानंतर देशभर आंदोलन चालू झाले, देशभरातून रत्नाकर गायकवाड या विदुष्काबद्दल आंबेडकरी जनतेच्या तीव्र प्रतिक्रिया येत होत्या त्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशभरातील आंबेडकरी जनता भर पावसात आंबेडकर भवन उध्वस्त करणाऱ्या त्या हारामखोरला अटक करा म्हणून मुंबईच्या रस्त्यावर उतरली होती. हाच रत्नाकर गायकवाड मागे औरंगाबाद येथिल सुभेदारी विश्रामगृहावर आला असता अमित भुईगळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी या विदूषकाला चांगलाच चोप दिला होता.
आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू पाडणाऱ्या रत्नाकर गायकवाड यांना मारहाण झाल्याने आंबेडकरी जनतेमध्ये आनंद व्यक्त केला जात होता. आंबेडकरी समाजा विरोधात काम करणाऱ्या अश्या अधिकाऱ्यांना यापुढे अशीच शिक्षा देऊन सरळ करण्याची गरज असल्याचे मत आंबेडकरी जनतेमधून व्यक्त केले जात होते व त्याचाच भाग म्हणून अमित भुईगळ यांचा राज्यभर आंबेडकरी जनतेकडून सत्कार करण्यात येत होता.
1 जानेवारी 2018 पुणे येथे भीमकोरेगाव विजयोत्सव साजरा करण्यासाठी आलेल्या लाखो आंबेडकरी जनतेवर सरकारच्या संगनमताने व प्रमुख सूत्रधार भिडे-एकबोटे यांच्या नपुसक औलादिनी दगडफेक केली व मोठी दंगल उसळली. भीमकोरेगाव मधील आंबेडकरी जनतेवर हल्ला झाला म्हणून 1 जानेवारीच्या सायंकाळी त्याचा निषेध म्हणून राज्यभर आंबेडकरी जनतेकडून हिंसक प्रतिक्रिया उमटत होत्या त्यात सर्वात ज्यास्त जाळपोळ ही औरंगाबाद येथे झाली होती तसेच आद. बाळासाहेबआंबेडकर यांनी तीन जानेवारीला बंदच कॉल दिला होता. बाळासाहेबांच्या हाकेला आंबेडकरी जनतेने मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत संपूर्ण महाराष्ट्र इतिहासात पहिल्यांदाच कडकडीत बंद केला होता. हेच कोठेतरी जातीवादी सरकारच्या पचनी पडले नाही म्हणून या सरकारने औरंगाबाद सहित राज्यभर कोंबिंग ऑपरेशन राबवले व भीमसैनिकांना अटक करण्यात येत होती. औरंगाबाद मध्ये जेथे जेथे कोंबिंग ऑपरेशन राबवले गेले तेथे तेथे अमित भुईगळ यांनी पोलीसांना विरोध केला व जर पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन त्वरित थांबवावे म्हणून अमित भुईगळ यांनी सरकारला आत्मदहणाचा इशारा दिला होता.
औरंगाबाद येथे अलीकडेच ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे शेतकरी महाअधिवेशन झाले त्यात त्या सभेची निमंत्रकाची भूमिका अमित भुईगळ यांच्याकडे होती व अमित भुईगळ यांनी देखील योग्य मॅनेजमेंट आणि नेतृत्वाची चुनुक दाखवणारी ही सभा ना भूतो ना भविष्यती असी साकार करून दाखवली होती. जेथे प्रस्थापित पक्षांची जबिंदा मैदानावर सभा घेन्यासाठी हातभर फाटते तेथे इतिहासातील पहिली सभा जबिंदा मैदानावर भरलेली असताना आंबेडकरी, मुस्लिम, ओबीसी समाज भर उन्हात दोन नेत्यांना ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्याने उपस्तीत होता, प्रस्थापित पक्ष या अगोदरही आणि या नंतरही एवढी गर्दी तेथे कधीच जमवू शकला नाही व निमंत्रक म्हणून अमित भुईगळ यांनी ही सभा यशस्वी करून दाखवली होती.
अमित भुईगळ यांच्या सारखे समाजाशी व नेत्याशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता राज्याच्या विधानसभेत पोहचला पाहिजे. आंबेडकरी समाजाचा बुलंद आवाज ते ठरतील. औरंगाबाद पश्चिम मधून अमित भुईगळ यांना आंबेडकरी जनतेने निवडून आणण्याची आता जबाबदारी घ्यावी पण त्यासाठी सगळ्यांनी आतापासून मेहनत घेणे गरजेचे आहे. समाजाला जेव्हा गरज असते तेव्हा रत्नाकर गयकवाड सारखे पंचतारांकित अधिकारी नाही तर अमित भुईगळ यांच्या सारखे निष्ठावंतच कार्यकर्ते आपल्या मदतीला धावून येतात. विश्वास नसेल तर अजमावून पाहा. येणारी २०१९ची निवडणूक हि केवळ निवडणूक नसून ती आपल्या अस्तित्वाची अग्निपरीक्षा आहे आता आपणच ठरवायचंय लढून जगायचंय कि जळून मरायचय म्हणून बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे ज्यास्तीत ज्यास्त उमेदवार कसे निवडून येथील याकडे आपल्या सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. परत एखदा अमित भाऊ याना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्या....🎂💐
Friday, 28 March 2014
श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार आहे.
मुंबई- भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार असून भारतीय पद्धतीचे प्रशस्त बुद्धविहार देखील उभारण्यात येणार आहे. साधारणता एक ते दीड वर्षात हि संकल्पना प्रत्यक्ष स्वरुपात येणार आहे, तसेच या प्रस्तावित भवनाचे भूमिपूजन श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते तर अनावरण भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते करण्याची योजना असल्याची माहिती इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे को-ऑडीनेटर तसेच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्यालयीन सचिव भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो यांनी दिली.
अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या धर्तीवर जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या नावाने भरीव कार्यक्रम आखून जगभरात नेटवर्क उभे करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून भारतीय बौद्धांच्या सहकार्याने कोलंबो शहरातील अरवल पन्निपिटिय या शहरात सव्वा दोन एकर जागेवर हे भवन उभे राहणारअसून इंडो- श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्क या संस्थेने हि जागा संपादित केली असल्याची माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली.
भारतीय बौद्धांच्या शिष्टमंडळाने डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली २२ फेब्रुवारी २०१३ रोजी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांची कॅन्डी येथे भेट घेतली होती. महाबोधी सोसायटीचे (श्रीलंका ) मरदान कोलंबो येथे चार मजली भव्य कार्यालय, बुद्धविहार, भिक्खू ट्रेनिंग सेंटर तसेच पूज्य भन्ते अनागरिक धम्मपाल यांचा पुतळा आहे. सदर भवनासमोर धम्मपाल यांच्या पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, कोलंबो तील भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच भारतीय पद्धतीच्या बुद्धविहार निर्मितीस या बैठकीत मान्यता देण्यात आली ,अशी माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली. गवर्नर टिकीरी कोब्बेकडून, डॉ. डब्लू. ए. आय. विक्रमसिंघे, डॉ. जीवक भंडार, माजी खासदार रामदास आठवले, अविनाश कांबळे, लॉर्ड बुद्ध चेनेलचे संचालक सचिन मून, भदन्त रेवत बोधी, इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे श्रीलंका को- ऑडीनेटर सेनक वीररत्ने, डॉ. लीलकनाथ विरसिंघे, संघनायक भदन्त किरम विमलज्योती महाथेरो यांच्यासह अनेक मान्यवरांचा या शिष्टमंडळात समावेश होता.
सदर निर्णयाच्या अनुषंगाने इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कने कोलंबोपासून सात किलोमीटर अंतरावर अरवल पन्निपिटीय येथे सव्वा दोन एकर जागा संपादित करण्यात आली आहे. या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन कार्यदर्शन प्रदर्शन, फोटोबायोग्राफी, अध्ययन केंद्र रायटिंग अंड स्पीचेस सशोधन केंद्र, भारतीय भिक्खू-भिक्खुनी प्रशिक्षण केंद्र, भारतीयांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, विपश्यना केंद्र, पाली, संस्कृत भाषा सशोधन व प्रशिक्षण केंद्र , भारतीय आणि श्रीलंकन बुद्धिस्ट संस्कृती संशोधन आणि जतन केंद्र, सम्राट अशोक आणि अर्हत महेंद्र संशोधन केंद्र लायब्ररी, भिक्खू निवास मिटिंग हॉल आदीचा समावेश राहणारआहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचे महा बुद्धविहार देखील या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राहुल बोधी यांनी दिली. सदर जागेची पाहणी करण्यासाठी भारतीय बौद्धांचे शिष्टमंडळ डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली येत्या २५ सप्टेबर रोजी श्रीलंका दौ-यावर जाणार आहे.
या वास्तू उभारणीचा खर्च पूर्णपणे भारतीय बौद्धांनी उचलायचा आहे. या निधी संकलनासाठी लवकरच कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि मान्यवराच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास भन्ते डॉ. राहुल बोधी यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिल समोर १९५४ साली भाषण करतांना म्हणाले होते की
डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिल समोर १९५४
साली भाषण करतांना म्हणाले होते की, “विहारात दर रविवारी सामुदायिक बौध्द
वंदना व त्यानंतर बौध्द धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.” तसेच २४
नोव्हेंबर १९५६ ला सारनाथला ते म्हणाले होते की,”प्रत्येक बौध्दाने
आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण
करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा
घेण्यासाठी सभागृह बांधावे.”
जय भिम
लव भीम
नमो बुद्धाय
जय भिम
लव भीम
नमो बुद्धाय
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा 'शाळा प्रवेश' दिन... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शाळा प्रवेश' आज ११३ वर्षांचा झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील भिमाई कुंज येथे इयत्ता पहिलीत त्यांनी प्रवेश घेतला होता.
आज
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा 'शाळा प्रवेश' दिन...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शाळा प्रवेश' आज
११३ वर्षांचा झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील
भिमाई कुंज येथे इयत्ता पहिलीत त्यांनी प्रवेश घेतला होता.
माझे बाबासाहेब शाळाच शिकले नसते तर
चळवळीची क्रांती उभी राहिली नसती. तत्कालीन गव्हर्नमेंट
हायस्कूल आणि आताची प्रतापसिंग राजे विद्यालय येथे ७
नोव्हेंबरला बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला होता.
या दिवसाचा ऐतिहासिक वारसा आजही त्या शाळेने जपून
ठेवला आहे. 1904 मध्ये ते याच शाळेतून इयत्ता चौथी वर्ग
उत्तीर्ण झाले. पुढे मुंबईत त्यांनी पुढील शिक्षण घेतले.
दलितांचे कैवारी, संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब शिकले नसते
तर या सर्व घटना घडल्या नसत्या. त्यांच्या क्रांतीने अनेक
घटना ऐतिहासिक नोंदी झाल्या.पुढे बाबांच्या शिक्षणाने इतके
नाव लौकिक कमावले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील १००
विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे.
त्यानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा यांच्या हस्ते त्या विद्यापीठात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेचे समारंभपूर्वक अनावरण नुकतेच
करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्या क्रमांकावर
गणना झालेली विद्वानांची ती यादी शिल्पात कोरून
कोलंबिया विद्यापीठात दर्शनी भागात झळकवण्यात
आली आहे. त्यात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांसह अन्य
राष्ट्रांच्या सहा राष्ट्राध्यक्षांचा समावेश असून त्यातील
डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत. जगभरातील १००
विद्वानांची ती यादी तज्ज्ञांच्या एका समितीने
आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वानांची मते अजमावून तयार
केली आहे. त्यामुळे भारताच्या भूमीतील महूच्या मातीत
जन्मलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवर शंभर
नंबरी सोने ठरले आहेत.
ह्या महान विद्यार्थ्यास त्रिवार अभिवादन...जय भीम.
विठ्ठल मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार होते
विठ्ठल
मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार होते, विहार सर्व समजा करिता खुले होते, कारण
बुद्ध विचारात समता, बंधुभाव, करुणा, आपुलकी होती. १३ व्या शतका पासून
बहुजन समाजातील सर्व शुद्र अतिशूद्र संत उदा. गोरा कुंभार, नरहरी सोनार,
सावता माळी, सेनान्हावी, चोखोबा- सोयराबाई -बांका- निर्मला महार, तुकाराम
कुणबी, ... यांनीबुद्धाच्या समतावादी विचारांचा प्रचार केला.
मात्र ब्राह्मण बडव्यानि आपल्या नीच वृत्ती प्रमाणे मूर्तीत बदल करून,बुद्धाचे विठ्ठल केले व शुद्र अतिशूद्र संत सह बहुजनांनामंदिर प्रवेश नाकारला.
हा इतिहास बाबासाहेबांना माहित होता,, लोकांना याबाबतजागृत केले पाहिजे, निदान सत्य इतिहास तरी बहुजनान पर्यंत नेवूया..
!!!...नमो बुद्धाय..!.जय भिम..!.जय प्रबुद्ध भारत...!!

Subscribe to:
Posts (Atom)