Friday, 28 March 2014

श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार आहे.

मुंबई- भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार असून भारतीय पद्धतीचे प्रशस्त बुद्धविहार देखील उभारण्यात येणार आहे. साधारणता एक ते दीड वर्षात हि संकल्पना प्रत्यक्ष स्वरुपात येणार आहे, तसेच या प्रस्तावित भवनाचे भूमिपूजन श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते तर अनावरण भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते करण्याची योजना असल्याची माहिती इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे को-ऑडीनेटर तसेच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्यालयीन सचिव भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो यांनी दिली.

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या धर्तीवर जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या नावाने भरीव कार्यक्रम आखून जगभरात नेटवर्क उभे करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून भारतीय बौद्धांच्या सहकार्याने कोलंबो शहरातील अरवल पन्निपिटिय या शहरात सव्वा दोन एकर जागेवर हे भवन उभे राहणारअसून इंडो- श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्क या संस्थेने हि जागा संपादित केली असल्याची माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली.

भारतीय बौद्धांच्या शिष्टमंडळाने डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली २२ फेब्रुवारी २०१३ रोजी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांची कॅन्डी येथे भेट घेतली होती. महाबोधी सोसायटीचे (श्रीलंका ) मरदान कोलंबो येथे चार मजली भव्य कार्यालय, बुद्धविहार, भिक्खू ट्रेनिंग सेंटर तसेच पूज्य भन्ते अनागरिक धम्मपाल यांचा पुतळा आहे. सदर भवनासमोर धम्मपाल यांच्या पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, कोलंबो तील भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच भारतीय पद्धतीच्या बुद्धविहार निर्मितीस या बैठकीत मान्यता देण्यात आली ,अशी माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली. गवर्नर टिकीरी कोब्बेकडून, डॉ. डब्लू. ए. आय. विक्रमसिंघे, डॉ. जीवक भंडार, माजी खासदार रामदास आठवले, अविनाश कांबळे, लॉर्ड बुद्ध चेनेलचे संचालक सचिन मून, भदन्त रेवत बोधी, इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे श्रीलंका को- ऑडीनेटर सेनक वीररत्ने, डॉ. लीलकनाथ विरसिंघे, संघनायक भदन्त किरम विमलज्योती महाथेरो यांच्यासह अनेक मान्यवरांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

सदर निर्णयाच्या अनुषंगाने इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कने कोलंबोपासून सात किलोमीटर अंतरावर अरवल पन्निपिटीय येथे सव्वा दोन एकर जागा संपादित करण्यात आली आहे. या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन कार्यदर्शन प्रदर्शन, फोटोबायोग्राफी, अध्ययन केंद्र रायटिंग अंड स्पीचेस सशोधन केंद्र, भारतीय भिक्खू-भिक्खुनी प्रशिक्षण केंद्र, भारतीयांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, विपश्यना केंद्र, पाली, संस्कृत भाषा सशोधन व प्रशिक्षण केंद्र , भारतीय आणि श्रीलंकन बुद्धिस्ट संस्कृती संशोधन आणि जतन केंद्र, सम्राट अशोक आणि अर्हत महेंद्र संशोधन केंद्र लायब्ररी, भिक्खू निवास मिटिंग हॉल आदीचा समावेश राहणारआहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचे महा बुद्धविहार देखील या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राहुल बोधी यांनी दिली. सदर जागेची पाहणी करण्यासाठी भारतीय बौद्धांचे शिष्टमंडळ डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली येत्या २५ सप्टेबर रोजी श्रीलंका दौ-यावर जाणार आहे.

या वास्तू उभारणीचा खर्च पूर्णपणे भारतीय बौद्धांनी उचलायचा आहे. या निधी संकलनासाठी लवकरच कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि मान्यवराच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास भन्ते डॉ. राहुल बोधी यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिल समोर १९५४ साली भाषण करतांना म्हणाले होते की

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिल समोर १९५४ साली भाषण करतांना म्हणाले होते की, “विहारात दर रविवारी सामुदायिक बौध्द वंदना व त्यानंतर बौध्द धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.” तसेच २४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथला ते म्हणाले होते की,”प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.”

जय भिम

लव भीम

नमो बुद्धाय

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा 'शाळा प्रवेश' दिन... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शाळा प्रवेश' आज ११३ वर्षांचा झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील भिमाई कुंज येथे इयत्ता पहिलीत त्यांनी प्रवेश घेतला होता.


आज
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा 'शाळा प्रवेश' दिन...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शाळा प्रवेश' आज
११३ वर्षांचा झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील
भिमाई कुंज येथे इयत्ता पहिलीत त्यांनी प्रवेश घेतला होता.
माझे बाबासाहेब शाळाच शिकले नसते तर
चळवळीची क्रांती उभी राहिली नसती. तत्कालीन गव्हर्नमेंट
हायस्कूल आणि आताची प्रतापसिंग राजे विद्यालय येथे ७
नोव्हेंबरला बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला होता.
या दिवसाचा ऐतिहासिक वारसा आजही त्या शाळेने जपून
ठेवला आहे. 1904 मध्ये ते याच शाळेतून इयत्ता चौथी वर्ग
उत्तीर्ण झाले. पुढे मुंबईत त्यांनी पुढील शिक्षण घेतले.
दलितांचे कैवारी, संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब शिकले नसते
तर या सर्व घटना घडल्या नसत्या. त्यांच्या क्रांतीने अनेक
घटना ऐतिहासिक नोंदी झाल्या.पुढे बाबांच्या शिक्षणाने इतके
नाव लौकिक कमावले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील १००
विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे.
त्यानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा यांच्या हस्ते त्या विद्यापीठात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेचे समारंभपूर्वक अनावरण नुकतेच
करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्या क्रमांकावर
गणना झालेली विद्वानांची ती यादी शिल्पात कोरून
कोलंबिया विद्यापीठात दर्शनी भागात झळकवण्यात
आली आहे. त्यात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांसह अन्य
राष्ट्रांच्या सहा राष्ट्राध्यक्षांचा समावेश असून त्यातील
डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत. जगभरातील १००
विद्वानांची ती यादी तज्ज्ञांच्या एका समितीने
आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वानांची मते अजमावून तयार
केली आहे. त्यामुळे भारताच्या भूमीतील महूच्या मातीत
जन्मलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवर शंभर
नंबरी सोने ठरले आहेत.
ह्या महान विद्यार्थ्यास त्रिवार अभिवादन...जय भीम.

विठ्ठल मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार होते

विठ्ठल मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार होते, विहार सर्व समजा करिता खुले होते, कारण बुद्ध विचारात समता, बंधुभाव, करुणा, आपुलकी होती. १३ व्या शतका पासून बहुजन समाजातील सर्व शुद्र अतिशूद्र संत उदा. गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, सेनान्हावी, चोखोबा- सोयराबाई -बांका- निर्मला महार, तुकाराम कुणबी, ... यांनीबुद्धाच्या समतावादी विचारांचा प्रचार केला.
मात्र ब्राह्मण बडव्यानि आपल्या नीच वृत्ती प्रमाणे मूर्तीत बदल करून,बुद्धाचे विठ्ठल केले व शुद्र अतिशूद्र संत सह बहुजनांनामंदिर प्रवेश नाकारला.
हा इतिहास बाबासाहेबांना माहित होता,, लोकांना याबाबतजागृत केले पाहिजे, निदान सत्य इतिहास तरी बहुजनान पर्यंत नेवूया..
!!!...नमो बुद्धाय..!.जय भिम..!.जय प्रबुद्ध भारत...!!

सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली,

सहा डिसेंबर छप्पन साली

वेळ कशी ती हेरली,

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली


बुद्धंम शरणं गच्छामी

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

हिंदुधर्मातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पिढीजात अनिष्ठ रुढी परंपरेविरुद्ध अफाट धर्मांध शक्तीच्या विरोधात ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जातीभेदाच्या व धर्मरुढीच्या बेडया तोडून, समदु:खी स्त्रियांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी रणमैदानी उतरल्या. हालअपेष्टा, यातना सहन करुन व अपमानाची पर्वा न करता बहुजन समाजाची विशेषत: सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांची निस्वार्थपणे अविरत सेवा करण्यासाठी मोठया धैर्याने पुरुषासारखा संघर्ष करावा लागला. स्त्री उद्धाराकरीता संपूर्ण आयुष्य चंदानसारखे झिजून बहुजन स्त्रियांची कायमचीच मुक्तता केली. स्त्री व पुरुषांवर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अनंत उपकार करुन ठेवले आहेत. त्यांच्या या प्रभावी प्रेरणेने जीवनमान प्रकाशमय झाले असून, स्त्रियांना भक्कम पाठबळ प्राप्त होऊन एकप्रकारची चालना मिळाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्यामुळेच आज स्त्री ही स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कासाठी पुरुषांना आव्हान करीत मोठया हिम्मतीने बंड करण्यास पुढे येऊ लागली आहे.


सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर आपणास असे दिसून येईल की, पेशवाईच्या काळात मनुस्मृतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पूर्णत: बंदी होती. त्यांना कुठलेच अधिकार नव्हते. शूद्रातिशूद्र सोडून बाकी पुरुषांनाच सर्वाधिकार होते. स्त्रियांना पुरुषांची एक उपभोग वस्तू म्हणून बघितले जात होते. बालविवाह, पतीच्या मृत्युनंतर केशवपन, सती जाणे, पुनर्विवाहास(स्त्रियांच्या) बंदी, त्यांच्याशी व्याभिचार, शिक्षणास बंदी, अंधश्रद्धा, अज्ञान इत्यादी अत्याचार, हिंदुधर्माच्या नावाखाली या अनिष्ट चालीरिती सर्रास राजरोसपणे सुरु होता. त्यांनी आधारगृहे सुद्धा चालविली. स्त्रियांचे जीवन अगदी अंधारमय करुन, गुलामापेक्षाही वाईट वागणूक देऊन, अत्याचाराच्या खोल दरीत लोटून उद्धवस्त केले जायचे. या विरोधात त्या शेवटपर्यंत लढल्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षीच ज्योतिबा फुलेंशी 1840 मध्ये झाला. त्यावेळी ज्योतिबा फुलेंचे वय 13 वर्षांचे होते. समविचारांच्या व्यक्ती एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात परिवर्तनाचा पाया घालणाऱ्या व्यक्तीपैकी पहिले युगपुरुष खऱ्या अर्थाने ठरले. विवाह झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंकडून शिक्षणाचे प्रथम धडे घेतले. त्यानंतरच त्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित शिक्षिका म्हणून बाहेर पडल्या. फुलेंनी पुणे शहरी 1884 साली सर्वात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई या शिक्षिकेचे काम करु लागल्या. शाळेत शिकावयास जात असताना दररोज त्यांच्यावर प्रस्थापितांचे टवाळके शेणमाती, चिखल व दगडधोंडयांचा वर्षाव करुन, टवाळकी, निंदा व घाणेरडया शब्दात बोलून त्यांचा अतोनात छळ करायचे. हा सारा छळ त्यांनी मुकाटयानी सहन केला. त्या कधीच डगमगल्या व घाबरल्या नाहीत. तसूभरही खचून न जाता त्यांनी आपले शिक्षणदानाचे काम अविरतपणे मोठया कष्टाने, नेटाने व धैर्याने सातत्याने सुरुच ठेवले.
असाच एक दिवसाचा प्रसंग, त्या शाळेत जात असताना ब्राम्हणी टवाळक्या मुलांनी त्यांना रस्त्यात छळणे सुरु केले. त्यातील एका टवाळखोर मुलगा रस्त्यात उभा राहून दम देऊन बोलू लागला, 'ए सटवे तू उद्यापासून शाळेत शिकवायला जाणे बंद कर? नाही तर तुझी रस्त्यातच अब्रू लुटीन?' त्याच्या या आक्रमक बोलण्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या फार घाबरुन गेल्या. तरीपण क्षणातच स्वत:ला सावरुन व हिम्मत करुन(सहनशीलतेची सीमा ओलांडल्यावर) त्या मस्तावलेल्या टवाळक्याच्या थोबाडात चपला हाणल्या. त्यांचा तो अग्निक्रोध बघून बाकीचीही टवाळखोर मुलं तेथून पसार झाली. शाळा सुटल्यावर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंजवळ घडलेला प्रकार सांगितला. ही बातमी वाऱ्यासारखी पुणे शहरी जिकडेतिकडे पसरली. उस्ताद लहुजी साळवे(ज्योतिबांचे गुरु) यांनाही वार्ता कळली. त्यांनी फुले दांपत्याच्या घरी जाऊन दोघांनाही मोठा धीर दिला. तू घाबरु नकोस बेटी! उद्यापासून मी तुला शाळेत पोहचवून देण्याचे काम करीन. पाहू मग कोण 'लाल' रस्त्यात आडवा येतो, नि अंगाला हात लावतो ते? त्याचे तंगडे तोडून त्याच्याच हातात देईन! तरच लहु साळवे नावाचा. त्याकाळी शूद्रातिशूद्रांना शिकणे म्हणजे महाभयंकर काम होते. मग स्त्रियांना शाळा शिकणे तर कोसोदूर होते. सावित्रीबाईंनी हिम्मत वा धैर्य बाळगून ज्योतिबांना साथ देण्यासाठी समाजाची, हिंदुधर्म ग्रंथाची व त्यांच्या छळाची अजिबात पर्वा केली नाही आणि ज्योतिबा फुलेंच्या सहवासात राहून त्यांनी पाच वर्षात 20 शाळा चालवून दाखवल्या.
आत्महत्या करण्यास निघालेल्या एका काशी नावाच्या ब्राम्हण व गरोदर असलेल्या विधवा स्त्रीला सावित्रीबाईंनी जीवदान दिले. घरी आणून तिचे बाळंतपण केले आणि जन्मास आलेल्या मुलास दत्तक घेतले. परंतु हिंदुधर्माच्या ठेकेदारांना ते रुचले नाही व आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांना जाती-धर्मावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. अशा अडल्या नडल्या व वाळीत टाकलेल्या अशा अनेक स्त्रियांना त्यांनी मायेची सावली व उब देऊन त्यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांना चांगल्या तऱ्हेने जगता यावे म्हणून त्यांच्यात या कुजलेल्या मनाच्या समाजासाठी बंड करण्यास व प्रसंगी लढण्याकरीता उत्साह व पाठबळ दिले. सारजा व गणेश या प्रेमीयुगुलाचा समाजाच्या क्रोधाग्नीतून बचाव करुन आंतरजातीय विवाह लावून दिला.
गावोगावी फिरुन सभा-संमेलने घेऊन स्त्रियांना शाळेत घाला, अस्पृश्यता पाळणे, हुंडापद्धती, सतीप्रथा, बालहत्या बंद करा. विधवांचे पुनर्विवाह लावून द्यावे, केशवपन थांबवावे, आधारगृह चालवावे इ. मौलिक विचार त्या सतत मांडून प्रचार व प्रसार करु लागल्या. बहुजन समाजाकडून याला चांगला प्रतिसाद मिळून स्त्रियांत चेतना निर्माण होऊ लागली. सावित्रीबाईंच्या या आव्हानामुळे अनेक स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. स्त्रियांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कमी होऊ लागले. बालहत्या, विधवा स्त्रियांचे केशवपन, सती जाण्यास आळा बसला, विधवाचे पुनर्विवाह होऊ लागले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने स्त्री उद्धारक, स्त्री मुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व समतावादी असे मोठया अभिमानाने म्हटले जाते. त्यांनी केलेल्या योगदानामुळेच सर्व स्त्रियांचा विकास झालेला आहे व आजही होत आहे. म्हणून आजची स्त्री ही समाजापुढे जाती धर्माच्या भिंतीला हादरे देऊन, ताठमानेने उभी राहून पुरुषांशी सुद्धा स्पर्धा करु लागली आहे आणि स्त्रियांच्या अनेक संघटना उभारुन अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढे उभारण्याचे व चळवळी चालवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत आहेत. अशा या स्त्रीमुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री उद्धारक, समतावादी समाज सुधारक व युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला योग्य दिशा देऊन साऱ्या समाजाला आयुष्यभर प्रकाश देऊन सर्वांचे जीवन प्रकाशित केले. आयुष्यभर धडपडणाऱ्या आणि सातत्याने संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्लेग या आजाराने 10 मार्च 1897 साली क्रांतिज्योत कायमचीच विझली.

क्रांतीज्योती सावित्रीमाई यांना विनम्र अभिवादन !!!
सर्वाना सावित्रीमाई जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हे ... आग हवी शत्रूला उभे पेटवण्या साठी क्रांतीच्या ठिणग्या घरात घरात पोहोचवा..... मग तुमचेकुणी वाकडे करणार नाही पण .... जागता पहारा ठेवा ... राबता ठेवा ... गाफील पहारा राहू नका ! ....... !!६!! !! जयभीम !!



हे ! शूरांच्या औलादानो ...... हे !
शूरांच्या औलादानो पोलादी छातीच्या रांगड्या मर्दांनो !
तुमची वाघ नखे सदैव धारदार असुद्या...... अन्यायाचा घोट घेण्या साठी! तुमची मुठ आवळा...भीमटोला देण्यास हे नागवंशाच्या आकाशदिपानो..... तुमच्या शौर्याने ह जंबुद्वीप दणाणला पाहिजे .....!!१!!
शिवबाच्या स्वराज्याच्या झेंडा तुम्ही गडलाय इथे ....जुलमाचा छाताडात आपल्या रक्ताचा थेंब थेंब सांडून रायगडचाही घसा बसलाय, तुमच्या शौर्याच्या गाथा सांगून तू तोच मावळा आहेस, शिवबाच्या गळ्यात विजयीमाला घालणारा ......!!२!!

ते गोरेही अवाक झालेत ..भीमा कोरेगावला, तुझ्या समशेरीचे वार पाहून .. गांडूच्या पिलावळीला कचा-कचा कापताना पाहून ....तुझा तो दणका होता, विषमतेच्या विषवल्लीवर.. भीमा नदीला अक्षरशः पूर आणला तुम्ही मर्दानो ..ती दुथडी वाहली.............अन्यायाचे रक्त घेऊन..........

!!३!! भीमाच्या लेखणीच्या तांडवाने शत्रू गर्भगळीत झाला...
महाडचे पाणी पेटले....
नासिकचा काळाराम भेदरला ....
मनुस्मृतीने आत्मत्याग केला... माणगाव थरथरले ......
गोलमेज परिषदा दणाणल्या ...
हा प्रकोप होता ! न्यायाचा अन्यायावर .....
समतेचा विषमतेवर ....
स्वातंत्र्यचा गुलामगीरीवर..
स्वातंत्र्य, समता, न्यायाची गुढी उभारण्यासाठी !
बाबासाहेबांनी दिलेला तो घाव ...

आजही यांच्या वर्मी बसतो मग .....

ते टाकतात विखारी फुत्कार !!४!!

म्हणून ...आज ही तुम्हाला तुमच्या तलवारी पर्जाव्या लागतील ....

पोचीराम कांबळे च्या रक्ताच्या चीरकांड्या मोजाव्या लागतील ...
खैरलांजीत घडलेला पाशवी अन्यायाच्या गाथा वाचाव्या लागतील ...... नामांतरात उभ्या पेटलेल्या झोपड्याच्या किंकाळ्या आठवाव्या लागतील ... तेव्हा तुम्हाला कळेल ...
कि आपल्या आयाबाहीनीच्या अब्रू स्वस्त नाही आपल्या बांधवांच्या कत्तली...
काही जनावरांच्या नव्हे .!!५ !!
उठा या आंबेडकरी तरुणांनो...
भीमसुर्याच्या बुद्धी तेजाने प्रकाशित झालेल्या मशालीनो संघर्ष तुमच्या दावणीला बांधा, ...
अन्याय-अत्याचारावर तडाखा देण्यासाठी या विषमतेचा गळा आवळा तिचा जीव जावस्तोवर.....
खल्लास करा त्या नकटीला इथे तोच यल्गार झाला पाहिजे ...

भीमा कोरेगावच्या तुमच्या हातात घ्या यांच्या लगामी ...

आणि द्या हिसका आता ...

तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हे ...
आग हवी शत्रूला उभे पेटवण्या साठी क्रांतीच्या ठिणग्या घरात घरात पोहोचवा.....
मग तुमचेकुणी वाकडे करणार नाही पण ....

जागता पहारा ठेवा ...

राबता ठेवा ...

गाफील पहारा राहू नका ! ....... !!६!!


!! जयभीम !!