Friday, 28 March 2014

श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन

भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार आहे.

मुंबई- भारताला लागून असलेल्या बुद्ध देश श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे लवकरच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सव्वादोन एकर जागेवर भवन उभारण्यात येणार असून भारतीय पद्धतीचे प्रशस्त बुद्धविहार देखील उभारण्यात येणार आहे. साधारणता एक ते दीड वर्षात हि संकल्पना प्रत्यक्ष स्वरुपात येणार आहे, तसेच या प्रस्तावित भवनाचे भूमिपूजन श्रीलंकन राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते तर अनावरण भारतीय पंतप्रधानांच्या हस्ते करण्याची योजना असल्याची माहिती इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे को-ऑडीनेटर तसेच अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्यालयीन सचिव भदन्त डॉ. राहुल बोधी महाथेरो यांनी दिली.

अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. या धर्तीवर जगभरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची महती पोहचविण्यासाठी तसेच त्यांच्या नावाने भरीव कार्यक्रम आखून जगभरात नेटवर्क उभे करण्यासाठी पहिले पाऊल म्हणून भारतीय बौद्धांच्या सहकार्याने कोलंबो शहरातील अरवल पन्निपिटिय या शहरात सव्वा दोन एकर जागेवर हे भवन उभे राहणारअसून इंडो- श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्क या संस्थेने हि जागा संपादित केली असल्याची माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली.

भारतीय बौद्धांच्या शिष्टमंडळाने डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली २२ फेब्रुवारी २०१३ रोजी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांची कॅन्डी येथे भेट घेतली होती. महाबोधी सोसायटीचे (श्रीलंका ) मरदान कोलंबो येथे चार मजली भव्य कार्यालय, बुद्धविहार, भिक्खू ट्रेनिंग सेंटर तसेच पूज्य भन्ते अनागरिक धम्मपाल यांचा पुतळा आहे. सदर भवनासमोर धम्मपाल यांच्या पुतळ्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, कोलंबो तील भूखंडावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन तसेच भारतीय पद्धतीच्या बुद्धविहार निर्मितीस या बैठकीत मान्यता देण्यात आली ,अशी माहिती भदन्त डॉ. राहुल बोधी यांनी दिली. गवर्नर टिकीरी कोब्बेकडून, डॉ. डब्लू. ए. आय. विक्रमसिंघे, डॉ. जीवक भंडार, माजी खासदार रामदास आठवले, अविनाश कांबळे, लॉर्ड बुद्ध चेनेलचे संचालक सचिन मून, भदन्त रेवत बोधी, इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कचे श्रीलंका को- ऑडीनेटर सेनक वीररत्ने, डॉ. लीलकनाथ विरसिंघे, संघनायक भदन्त किरम विमलज्योती महाथेरो यांच्यासह अनेक मान्यवरांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

सदर निर्णयाच्या अनुषंगाने इंडो-श्रीलंका बुद्धिस्ट नेटवर्कने कोलंबोपासून सात किलोमीटर अंतरावर अरवल पन्निपिटीय येथे सव्वा दोन एकर जागा संपादित करण्यात आली आहे. या जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन कार्यदर्शन प्रदर्शन, फोटोबायोग्राफी, अध्ययन केंद्र रायटिंग अंड स्पीचेस सशोधन केंद्र, भारतीय भिक्खू-भिक्खुनी प्रशिक्षण केंद्र, भारतीयांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, विपश्यना केंद्र, पाली, संस्कृत भाषा सशोधन व प्रशिक्षण केंद्र , भारतीय आणि श्रीलंकन बुद्धिस्ट संस्कृती संशोधन आणि जतन केंद्र, सम्राट अशोक आणि अर्हत महेंद्र संशोधन केंद्र लायब्ररी, भिक्खू निवास मिटिंग हॉल आदीचा समावेश राहणारआहे. त्याचप्रमाणे भारतीय संस्कृतीचे महा बुद्धविहार देखील या ठिकाणी बांधण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राहुल बोधी यांनी दिली. सदर जागेची पाहणी करण्यासाठी भारतीय बौद्धांचे शिष्टमंडळ डॉ. राहुल बोधी यांच्या नेतृत्वाखाली येत्या २५ सप्टेबर रोजी श्रीलंका दौ-यावर जाणार आहे.

या वास्तू उभारणीचा खर्च पूर्णपणे भारतीय बौद्धांनी उचलायचा आहे. या निधी संकलनासाठी लवकरच कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून समाजातील दानशूर व्यक्ती आणि मान्यवराच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास येईल असा विश्वास भन्ते डॉ. राहुल बोधी यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिल समोर १९५४ साली भाषण करतांना म्हणाले होते की

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रम्हदेशच्या बुध्दिस्ट शासन कौन्सिल समोर १९५४ साली भाषण करतांना म्हणाले होते की, “विहारात दर रविवारी सामुदायिक बौध्द वंदना व त्यानंतर बौध्द धर्मोपदेश देण्याची प्रथा पाडावी.” तसेच २४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथला ते म्हणाले होते की,”प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.”

जय भिम

लव भीम

नमो बुद्धाय

भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा 'शाळा प्रवेश' दिन... भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शाळा प्रवेश' आज ११३ वर्षांचा झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील भिमाई कुंज येथे इयत्ता पहिलीत त्यांनी प्रवेश घेतला होता.


आज
भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचा 'शाळा प्रवेश' दिन...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "शाळा प्रवेश' आज
११३ वर्षांचा झाला. ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील
भिमाई कुंज येथे इयत्ता पहिलीत त्यांनी प्रवेश घेतला होता.
माझे बाबासाहेब शाळाच शिकले नसते तर
चळवळीची क्रांती उभी राहिली नसती. तत्कालीन गव्हर्नमेंट
हायस्कूल आणि आताची प्रतापसिंग राजे विद्यालय येथे ७
नोव्हेंबरला बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला होता.
या दिवसाचा ऐतिहासिक वारसा आजही त्या शाळेने जपून
ठेवला आहे. 1904 मध्ये ते याच शाळेतून इयत्ता चौथी वर्ग
उत्तीर्ण झाले. पुढे मुंबईत त्यांनी पुढील शिक्षण घेतले.
दलितांचे कैवारी, संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब शिकले नसते
तर या सर्व घटना घडल्या नसत्या. त्यांच्या क्रांतीने अनेक
घटना ऐतिहासिक नोंदी झाल्या.पुढे बाबांच्या शिक्षणाने इतके
नाव लौकिक कमावले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांची कोलंबिया विद्यापीठाने निवडलेल्या जगभरातील १००
विद्वानांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर निवड झाली आहे.
त्यानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
ओबामा यांच्या हस्ते त्या विद्यापीठात डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेचे समारंभपूर्वक अनावरण नुकतेच
करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिल्या क्रमांकावर
गणना झालेली विद्वानांची ती यादी शिल्पात कोरून
कोलंबिया विद्यापीठात दर्शनी भागात झळकवण्यात
आली आहे. त्यात अमेरिकेच्या तीन राष्ट्राध्यक्षांसह अन्य
राष्ट्रांच्या सहा राष्ट्राध्यक्षांचा समावेश असून त्यातील
डॉ. आंबेडकर हे एकमेव भारतीय आहेत. जगभरातील १००
विद्वानांची ती यादी तज्ज्ञांच्या एका समितीने
आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्वानांची मते अजमावून तयार
केली आहे. त्यामुळे भारताच्या भूमीतील महूच्या मातीत
जन्मलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या पाठीवर शंभर
नंबरी सोने ठरले आहेत.
ह्या महान विद्यार्थ्यास त्रिवार अभिवादन...जय भीम.

विठ्ठल मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार होते

विठ्ठल मंदिर पूर्वीचे बुद्ध विहार होते, विहार सर्व समजा करिता खुले होते, कारण बुद्ध विचारात समता, बंधुभाव, करुणा, आपुलकी होती. १३ व्या शतका पासून बहुजन समाजातील सर्व शुद्र अतिशूद्र संत उदा. गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, सेनान्हावी, चोखोबा- सोयराबाई -बांका- निर्मला महार, तुकाराम कुणबी, ... यांनीबुद्धाच्या समतावादी विचारांचा प्रचार केला.
मात्र ब्राह्मण बडव्यानि आपल्या नीच वृत्ती प्रमाणे मूर्तीत बदल करून,बुद्धाचे विठ्ठल केले व शुद्र अतिशूद्र संत सह बहुजनांनामंदिर प्रवेश नाकारला.
हा इतिहास बाबासाहेबांना माहित होता,, लोकांना याबाबतजागृत केले पाहिजे, निदान सत्य इतिहास तरी बहुजनान पर्यंत नेवूया..
!!!...नमो बुद्धाय..!.जय भिम..!.जय प्रबुद्ध भारत...!!

सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली,

सहा डिसेंबर छप्पन साली

वेळ कशी ती हेरली,

दुष्ट काळाने भिमरायाची

प्राणज्योत ती चोरली


बुद्धंम शरणं गच्छामी

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले


स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

हिंदुधर्मातील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या पिढीजात अनिष्ठ रुढी परंपरेविरुद्ध अफाट धर्मांध शक्तीच्या विरोधात ज्योतिबा फुलेंच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जातीभेदाच्या व धर्मरुढीच्या बेडया तोडून, समदु:खी स्त्रियांचे अश्रू पुसण्यासाठी व त्यांच्यावर लादलेल्या गुलामगिरीतून कायमची मुक्तता करण्यासाठी रणमैदानी उतरल्या. हालअपेष्टा, यातना सहन करुन व अपमानाची पर्वा न करता बहुजन समाजाची विशेषत: सर्व जाती-धर्माच्या स्त्रियांची निस्वार्थपणे अविरत सेवा करण्यासाठी मोठया धैर्याने पुरुषासारखा संघर्ष करावा लागला. स्त्री उद्धाराकरीता संपूर्ण आयुष्य चंदानसारखे झिजून बहुजन स्त्रियांची कायमचीच मुक्तता केली. स्त्री व पुरुषांवर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी अनंत उपकार करुन ठेवले आहेत. त्यांच्या या प्रभावी प्रेरणेने जीवनमान प्रकाशमय झाले असून, स्त्रियांना भक्कम पाठबळ प्राप्त होऊन एकप्रकारची चालना मिळाली आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्यामुळेच आज स्त्री ही स्त्री स्वातंत्र्याच्या हक्कासाठी पुरुषांना आव्हान करीत मोठया हिम्मतीने बंड करण्यास पुढे येऊ लागली आहे.


सुमारे दोनशे वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर आपणास असे दिसून येईल की, पेशवाईच्या काळात मनुस्मृतीमुळे स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर पूर्णत: बंदी होती. त्यांना कुठलेच अधिकार नव्हते. शूद्रातिशूद्र सोडून बाकी पुरुषांनाच सर्वाधिकार होते. स्त्रियांना पुरुषांची एक उपभोग वस्तू म्हणून बघितले जात होते. बालविवाह, पतीच्या मृत्युनंतर केशवपन, सती जाणे, पुनर्विवाहास(स्त्रियांच्या) बंदी, त्यांच्याशी व्याभिचार, शिक्षणास बंदी, अंधश्रद्धा, अज्ञान इत्यादी अत्याचार, हिंदुधर्माच्या नावाखाली या अनिष्ट चालीरिती सर्रास राजरोसपणे सुरु होता. त्यांनी आधारगृहे सुद्धा चालविली. स्त्रियांचे जीवन अगदी अंधारमय करुन, गुलामापेक्षाही वाईट वागणूक देऊन, अत्याचाराच्या खोल दरीत लोटून उद्धवस्त केले जायचे. या विरोधात त्या शेवटपर्यंत लढल्या.
क्रांतिज्योती सावित्रीबाईंचा विवाह वयाच्या 9 व्या वर्षीच ज्योतिबा फुलेंशी 1840 मध्ये झाला. त्यावेळी ज्योतिबा फुलेंचे वय 13 वर्षांचे होते. समविचारांच्या व्यक्ती एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात परिवर्तनाचा पाया घालणाऱ्या व्यक्तीपैकी पहिले युगपुरुष खऱ्या अर्थाने ठरले. विवाह झाल्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंकडून शिक्षणाचे प्रथम धडे घेतले. त्यानंतरच त्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षिकेचे प्रशिक्षण घेऊन प्रशिक्षित शिक्षिका म्हणून बाहेर पडल्या. फुलेंनी पुणे शहरी 1884 साली सर्वात प्रथम मुलींची पहिली शाळा काढली. त्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई या शिक्षिकेचे काम करु लागल्या. शाळेत शिकावयास जात असताना दररोज त्यांच्यावर प्रस्थापितांचे टवाळके शेणमाती, चिखल व दगडधोंडयांचा वर्षाव करुन, टवाळकी, निंदा व घाणेरडया शब्दात बोलून त्यांचा अतोनात छळ करायचे. हा सारा छळ त्यांनी मुकाटयानी सहन केला. त्या कधीच डगमगल्या व घाबरल्या नाहीत. तसूभरही खचून न जाता त्यांनी आपले शिक्षणदानाचे काम अविरतपणे मोठया कष्टाने, नेटाने व धैर्याने सातत्याने सुरुच ठेवले.
असाच एक दिवसाचा प्रसंग, त्या शाळेत जात असताना ब्राम्हणी टवाळक्या मुलांनी त्यांना रस्त्यात छळणे सुरु केले. त्यातील एका टवाळखोर मुलगा रस्त्यात उभा राहून दम देऊन बोलू लागला, 'ए सटवे तू उद्यापासून शाळेत शिकवायला जाणे बंद कर? नाही तर तुझी रस्त्यातच अब्रू लुटीन?' त्याच्या या आक्रमक बोलण्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या फार घाबरुन गेल्या. तरीपण क्षणातच स्वत:ला सावरुन व हिम्मत करुन(सहनशीलतेची सीमा ओलांडल्यावर) त्या मस्तावलेल्या टवाळक्याच्या थोबाडात चपला हाणल्या. त्यांचा तो अग्निक्रोध बघून बाकीचीही टवाळखोर मुलं तेथून पसार झाली. शाळा सुटल्यावर क्रांतिज्योती सावित्रीबाईंनी ज्योतिबा फुलेंजवळ घडलेला प्रकार सांगितला. ही बातमी वाऱ्यासारखी पुणे शहरी जिकडेतिकडे पसरली. उस्ताद लहुजी साळवे(ज्योतिबांचे गुरु) यांनाही वार्ता कळली. त्यांनी फुले दांपत्याच्या घरी जाऊन दोघांनाही मोठा धीर दिला. तू घाबरु नकोस बेटी! उद्यापासून मी तुला शाळेत पोहचवून देण्याचे काम करीन. पाहू मग कोण 'लाल' रस्त्यात आडवा येतो, नि अंगाला हात लावतो ते? त्याचे तंगडे तोडून त्याच्याच हातात देईन! तरच लहु साळवे नावाचा. त्याकाळी शूद्रातिशूद्रांना शिकणे म्हणजे महाभयंकर काम होते. मग स्त्रियांना शाळा शिकणे तर कोसोदूर होते. सावित्रीबाईंनी हिम्मत वा धैर्य बाळगून ज्योतिबांना साथ देण्यासाठी समाजाची, हिंदुधर्म ग्रंथाची व त्यांच्या छळाची अजिबात पर्वा केली नाही आणि ज्योतिबा फुलेंच्या सहवासात राहून त्यांनी पाच वर्षात 20 शाळा चालवून दाखवल्या.
आत्महत्या करण्यास निघालेल्या एका काशी नावाच्या ब्राम्हण व गरोदर असलेल्या विधवा स्त्रीला सावित्रीबाईंनी जीवदान दिले. घरी आणून तिचे बाळंतपण केले आणि जन्मास आलेल्या मुलास दत्तक घेतले. परंतु हिंदुधर्माच्या ठेकेदारांना ते रुचले नाही व आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांना जाती-धर्मावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. अशा अडल्या नडल्या व वाळीत टाकलेल्या अशा अनेक स्त्रियांना त्यांनी मायेची सावली व उब देऊन त्यांच्यासाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. त्यांना चांगल्या तऱ्हेने जगता यावे म्हणून त्यांच्यात या कुजलेल्या मनाच्या समाजासाठी बंड करण्यास व प्रसंगी लढण्याकरीता उत्साह व पाठबळ दिले. सारजा व गणेश या प्रेमीयुगुलाचा समाजाच्या क्रोधाग्नीतून बचाव करुन आंतरजातीय विवाह लावून दिला.
गावोगावी फिरुन सभा-संमेलने घेऊन स्त्रियांना शाळेत घाला, अस्पृश्यता पाळणे, हुंडापद्धती, सतीप्रथा, बालहत्या बंद करा. विधवांचे पुनर्विवाह लावून द्यावे, केशवपन थांबवावे, आधारगृह चालवावे इ. मौलिक विचार त्या सतत मांडून प्रचार व प्रसार करु लागल्या. बहुजन समाजाकडून याला चांगला प्रतिसाद मिळून स्त्रियांत चेतना निर्माण होऊ लागली. सावित्रीबाईंच्या या आव्हानामुळे अनेक स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या. स्त्रियांच्या आत्महत्त्येचे प्रमाण कमी होऊ लागले. बालहत्या, विधवा स्त्रियांचे केशवपन, सती जाण्यास आळा बसला, विधवाचे पुनर्विवाह होऊ लागले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या खऱ्या अर्थाने स्त्री उद्धारक, स्त्री मुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका व समतावादी असे मोठया अभिमानाने म्हटले जाते. त्यांनी केलेल्या योगदानामुळेच सर्व स्त्रियांचा विकास झालेला आहे व आजही होत आहे. म्हणून आजची स्त्री ही समाजापुढे जाती धर्माच्या भिंतीला हादरे देऊन, ताठमानेने उभी राहून पुरुषांशी सुद्धा स्पर्धा करु लागली आहे आणि स्त्रियांच्या अनेक संघटना उभारुन अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढे उभारण्याचे व चळवळी चालवण्याचे महत्त्वाचे कार्य त्या करीत आहेत. अशा या स्त्रीमुक्ती चळवळीची जननी, भारतातील पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री उद्धारक, समतावादी समाज सुधारक व युगस्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजाला योग्य दिशा देऊन साऱ्या समाजाला आयुष्यभर प्रकाश देऊन सर्वांचे जीवन प्रकाशित केले. आयुष्यभर धडपडणाऱ्या आणि सातत्याने संघर्ष करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची प्लेग या आजाराने 10 मार्च 1897 साली क्रांतिज्योत कायमचीच विझली.

क्रांतीज्योती सावित्रीमाई यांना विनम्र अभिवादन !!!
सर्वाना सावित्रीमाई जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हे ... आग हवी शत्रूला उभे पेटवण्या साठी क्रांतीच्या ठिणग्या घरात घरात पोहोचवा..... मग तुमचेकुणी वाकडे करणार नाही पण .... जागता पहारा ठेवा ... राबता ठेवा ... गाफील पहारा राहू नका ! ....... !!६!! !! जयभीम !!



हे ! शूरांच्या औलादानो ...... हे !
शूरांच्या औलादानो पोलादी छातीच्या रांगड्या मर्दांनो !
तुमची वाघ नखे सदैव धारदार असुद्या...... अन्यायाचा घोट घेण्या साठी! तुमची मुठ आवळा...भीमटोला देण्यास हे नागवंशाच्या आकाशदिपानो..... तुमच्या शौर्याने ह जंबुद्वीप दणाणला पाहिजे .....!!१!!
शिवबाच्या स्वराज्याच्या झेंडा तुम्ही गडलाय इथे ....जुलमाचा छाताडात आपल्या रक्ताचा थेंब थेंब सांडून रायगडचाही घसा बसलाय, तुमच्या शौर्याच्या गाथा सांगून तू तोच मावळा आहेस, शिवबाच्या गळ्यात विजयीमाला घालणारा ......!!२!!

ते गोरेही अवाक झालेत ..भीमा कोरेगावला, तुझ्या समशेरीचे वार पाहून .. गांडूच्या पिलावळीला कचा-कचा कापताना पाहून ....तुझा तो दणका होता, विषमतेच्या विषवल्लीवर.. भीमा नदीला अक्षरशः पूर आणला तुम्ही मर्दानो ..ती दुथडी वाहली.............अन्यायाचे रक्त घेऊन..........

!!३!! भीमाच्या लेखणीच्या तांडवाने शत्रू गर्भगळीत झाला...
महाडचे पाणी पेटले....
नासिकचा काळाराम भेदरला ....
मनुस्मृतीने आत्मत्याग केला... माणगाव थरथरले ......
गोलमेज परिषदा दणाणल्या ...
हा प्रकोप होता ! न्यायाचा अन्यायावर .....
समतेचा विषमतेवर ....
स्वातंत्र्यचा गुलामगीरीवर..
स्वातंत्र्य, समता, न्यायाची गुढी उभारण्यासाठी !
बाबासाहेबांनी दिलेला तो घाव ...

आजही यांच्या वर्मी बसतो मग .....

ते टाकतात विखारी फुत्कार !!४!!

म्हणून ...आज ही तुम्हाला तुमच्या तलवारी पर्जाव्या लागतील ....

पोचीराम कांबळे च्या रक्ताच्या चीरकांड्या मोजाव्या लागतील ...
खैरलांजीत घडलेला पाशवी अन्यायाच्या गाथा वाचाव्या लागतील ...... नामांतरात उभ्या पेटलेल्या झोपड्याच्या किंकाळ्या आठवाव्या लागतील ... तेव्हा तुम्हाला कळेल ...
कि आपल्या आयाबाहीनीच्या अब्रू स्वस्त नाही आपल्या बांधवांच्या कत्तली...
काही जनावरांच्या नव्हे .!!५ !!
उठा या आंबेडकरी तरुणांनो...
भीमसुर्याच्या बुद्धी तेजाने प्रकाशित झालेल्या मशालीनो संघर्ष तुमच्या दावणीला बांधा, ...
अन्याय-अत्याचारावर तडाखा देण्यासाठी या विषमतेचा गळा आवळा तिचा जीव जावस्तोवर.....
खल्लास करा त्या नकटीला इथे तोच यल्गार झाला पाहिजे ...

भीमा कोरेगावच्या तुमच्या हातात घ्या यांच्या लगामी ...

आणि द्या हिसका आता ...

तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हे ...
आग हवी शत्रूला उभे पेटवण्या साठी क्रांतीच्या ठिणग्या घरात घरात पोहोचवा.....
मग तुमचेकुणी वाकडे करणार नाही पण ....

जागता पहारा ठेवा ...

राबता ठेवा ...

गाफील पहारा राहू नका ! ....... !!६!!


!! जयभीम !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57 महापरिनिरवान दिनी बाबासाहेबाना आभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी आणुयायी देश विदेशातुन आले, त्यात आनेक राजकारणी लोक पण आले


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57 महापरिनिरवान दिनी बाबासाहेबाना आभिवादन करण्यासाठी लाखो आंबेडकरी आणुयायी देश विदेशातुन आले, त्यात आनेक राजकारणी लोक पण आले, पण जसे बाळ ठाकरे कधी चैत्यभुमी वर आले नाहीत तसेच त्यांचे पुञ उद्धव ठाकरे पण चैत्यभुमी वर आले नाहीत पण तेथे त्यांचे banners आणि hording तेथे होते आणि ते तेथे आले नाहीत याचा पण काही फरक पडत नाही म्हणजे सांगण्याचा तात्परय हे आहे की ज्या बाळ ठाकरे ने आयुष्यभर बाबासाहेबांचा द्वेष केला, शिवसेनेने केलेली प्रत्येक गोष्ट ही घटना विरोधी म्हणजेच लोकशाही विरोधी केली, विद्यापिठ नामांतराला कायमच विरोध केला, घरात नाही पिठ मागतात विद्यापीठ, मराठवाड्याचा का महारवाडा करायचा आहे का, आसे जातीयवादक विधाने करून नामांतर लढ्यात मराठवाडा कायमच धगधगत ठेवला, बाबासाहेबांच्या स्मारकाला कायमच विरोध दर्शविणारे आसे बाळ ठाकरे पण याच बाळ ठाकरे ( शिवसेना ) सोबत राजकीय युती करणारे रामदास आठवले सारखे आपलेच काही नेते आंबेडकरी समाजात त्यांना मोठे करत आहेत, आठवले म्हणतात की बाळ ठाकरे चे स्मारक झाले पाहिजे आणि त्यांच्या स्मारकाला जागा द्यावी, पण आठवलेनी सांगावे की बाळ ठाकरे चे स्मारक का? आणी कशासाठी? का तुमचा राजकीय स्वारथ साधण्यासाठी? कीती दिवस तुम्ही आंबेडकरी समाजाला मुरख बनवणार आहात, कीती दिवस तुम्ही बाबासाहेबांच्या नावाने तुमचे स्वार्थि राजकारण चालवणार आहात? सर्वाना माहित आहे की इंदु मिल मिळावी म्हणुन कोणी आंदोलन केले, कोण रस्त्यावर उतरले, कोणी लाठ्या काठ्या खालल्या मग हा श्रेय घेण्याचा प्रकार कशासाठी, सहा डिसेंबर हा आपल्यासाठी दुःखाचा दिवस, तरी तुम्ही याच दिवसि इंन्दु मिलच्या जागेत स्मारकाचे भुमीपुजन करता हा देखावा कशासाठी, तुमचा राजकीय स्वारथ साधण्यासाठी कारण तुम्हाला पण माहित आहे महापरीवरीनिरवान दिनी लाखो लोक बाबासाहेबाना आभिवादन करण्यासाठी येतात म्हणजे तेथे पण तुमचा राजकीय स्टंट आसतो हे कशासाठी ?का तुम्हाला 6 डिसेंबर च्या आगोदर आणि नंतर कोणता दिवस नव्हता का? आठवले बस करा आता समाज जागृत झाला आहे त्याना विट आला आहे तुमच्या आसल्या राजकारणाचा.आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की जातीवादक, घटनाविरोधी, लोकशाही विरोधी बाळ ठाकरे च्या स्मारकाला आमचा कायमच विरोध राहिल, आणि माझ्या सारख्या तमाम भीमसैनिकांचा जातीवादक माणसाच्या स्मारकाला विरोध राहिल यात शंका नाही.शिवसेना आणि भाजपा यांच्या सोबत युती करण्याचा आगोदर तुम्हांला आठवले विचार पडला नाही का, घटना बदलाय नीघालेली भाजपा, आणि घटना विरोधी शिवसेना, नामांतर लढ्यात जे शहीद झाले त्यांचे खून करणारी पण हीच शिवसेना होती,रमाबाई हत्याकांडातील त्या psi ला पाठिशी घालणारी पण हीच ती शिवसेना होती तरीपण तुम्ही हात मिळवणी यांच्यासोबत करता? का आणि काशाशाठी फक्त एका खाशदारकी साठी ? तुम्ही banner त्या बाळ ठाकरे चे आणि उद्धव ठाकरे चे चैत्यभुमि वर, त्याने काय होते, त्यांनी कधी येउन अभिवादन केले का बाबासाहेबांना चैत्यभुमि वर? नाही केले याचा अर्थ बाबासाहेबा विषयी त्यांचा द्वेष आणखीन पण तसाच आहे, बाबासाहेबानी जे ताठ मानेनी जागाय शिकवलंय हे पण तुम्ही विसरलात का ? पण तुम्हाला हे कळणार नाही तुम्ही तुमचा स्वाभिमान घाण ठेवला आहे. त्या शिवसेना आणि भजापा कडे ते पण एका खासदारकी साठी, कदाचित तुम्हाला खासदारकी मिळेल, पण हा आंबेडकरी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही हे लक्षात असुद्या.


जय भिम





विकास रोडे

दोस्तो एक बार जोर से बोलो जय भीम

दोस्तो एक बार
जोर से बोलो
जय भीम

मीञांनो माझा आणखीन एक प्रश्न तुम्हाला, इतर जातीतील व्यक्ती तुम्हाला जय भीम म्हणालेली आवडेल का जय मुलनिवासी???


जय भीम मीञ हो आज काही विदेशातले लोक पण बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पाहुन आदराने जय भीम बोलतात, आज आशाच एका विदेशी महिलेने आज मला प्रश्न केला की जय भीम तर मला माहित आहे पण हे जय मुलनिवासी काय आहे "What is mean by Jay Mulnivasi ? थोडा विचार करून मी तिला उत्तर दिले तिला म्हणालो की भारतातील 97% समाज जो स्वतःहाला या देशाचा मुलनीवासी म्हणतो आणि म्हणून आपली स्वतःहाची अोळख सांगताना हे 97% लोक एका 3% लोक आसनार्या समाजाला आम्ही जय मुलनीवासी आहोत म्हणून सांगतात, बघा मीञांनो कीती लाजीरवानी गोष्ट आहे आज सार्या जगात जय भीम हा शब्द आदराने बोलला जातो पण आपलेच काही लोक जय भीम न म्हणता जय मुलनीवासी बोलत आहेत आणि इतर जातीतील लोक पण आज त्यांचे आनुकरण करताना दिसत आहेत हे कीती दुरदैवि आहे, निश्चितच याच पण आपल्याला विचार करावा लागेल ..


मीञांनो माझा आणखीन एक प्रश्न तुम्हाला, इतर जातीतील व्यक्ती तुम्हाला जय भीम म्हणालेली आवडेल का जय मुलनिवासी???

जय भीम


@- विकास रोडे

हे आम्हाला कोणत्याच शालेय अभ्यासक्रमात सांगितले जात नाही???

हे आम्हाला कोणत्याच शालेय अभ्यासक्रमात सांगितले जात नाही???

या पृथ्वीवर जे जिवंत आणी मेलेले माणसे आहेत त्यामध्ये सर्वात जास्त हुशार, शिकलेला, विद्वान पंडित जर कोणी असेल तर ते महामानव म्हणजे डाँ.बाबासाहेब आंबेडकर हे होय..

जय भीम

लव भीम

नमो बुद्धाय  

कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य

कामगारांच्या उत्कर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक,राजकीय घटना निर्मिती इत्यादी संबधीचे कार्य हे असामान्य आहेच,पण ह्या कार्याबरोबरच कामगारांच्या उत्कर्षासाठी केलेले कायदे व कामगार वर्गाच्या संबधीचे इतरही कार्य उल्लेखनिय व महत्वपूर्ण आहे. बाबासाहेबांच्या या अफाट कार्यासंबंधी भारतीय कामगार व कामगार संघटनांना अजुनही पुरेशी जाणीव झालेली नाही,ही अत्यंत खेदाची बाब आहे.

कामगारांसाठी बाबासाहेबांनी दिलेले योगदान खालील प्रमाणे आहे
१.शेतकर्यांसाठी किमान वेतन दर असावेत अशी मागणी विधिमंडळात केली

२.१९३७ साली कोकणातील बहुजन कामगारांचे शोषण थांबविण्यासंबंधी खोती पध्दत नष्ट करण्यासंबंधी बिल मांडले.

३.१९३८ साली कोकणातील ‘औद्योगिक कलह विधेयकानुसार’ कामगारांचा संप करण्याचा अधिकार हिरावुन घेतला गेला. पण बाबासाहेबांनी या बिलावर भाषण करतांना संप हा दिवाणी अपराध आहे, फौजदारी गुन्हा नव्हे असे मत दिले व पुढे कामगारांना संप करण्याचा कायदेशिर अधिकार मिळवून दिला.

४. वरील बिलावर भाष्य करतांना मालकांनी आपले अंदाजपत्रक कामगारांसाठी जाहीर करण्याची मागणी केली.

५.१९३८ मध्ये सावकारी नियंत्रण विधेयक तयार केले.

६.बिडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी बिडी कामगार संघ स्थापन केला.

७.२ जुलै १९४२ ला ते व्हॉईसरॉय मंत्रीमंडळात कामगार मंत्री झाले. ह्या कारकिर्दीत त्यांनी कामगारांसाठी बरेच कायदे निर्माण केले.

८.२ सप्टेंबर १९४५ ला कामगार कल्याण योजना सादर केली. ही योजना लेबर चार्टर म्हणून प्रसिध्द आहे.

९.युध्द साहित्य निर्माण करणार्या कारखान्यात एक ‘सयुक्त कामगार नियामक समिती’ स्थापन केली.

१०.सेवा योजन कार्यालय ( Employment Exchange ) ची स्थापना केली.

११.कामगारांना अगोदर भरपगारी रजा मिळत नव्हती. १४ एप्रील १९४४ ला बाबासाहेबांनी भरपगारी रजेचे विधेयक मंजूर केले.

१२.कामगारांना कमीत कमी वेतन ठरविण्याची तरतूद असलेले बिल मांडले. ह्यातूनच `किमान वेतन कायदा १९४८’ ची निर्मिती झाली.

१३.औद्योगिक कलह मिटविण्यासाठी समेट घडवून आणणारी यंत्रणा (लवाद यंत्रणा) उभारण्याची तरतूद केली.

१४.सप्टेंबर १९४३ रोजी भरलेल्या त्रिपक्षीय कामगार परिषदेचे बाबासाहेब अध्यक्ष होते.त्यात त्यानी कामगारांच्या अन्न, वस्त्र,

निवारा,शिक्षण,सांस्कृतिक गरजा व आरोग्याचे उपाय तसेच कामगारांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी उपाय यावरील ठराव संमत केले.

१५.३१ जानेवारी १९४४ रोजी खाण कामगारांसाठी ‘कोळसा खाण कामगार फंडाची’ स्थापना करणारे विधेयक मांडले.

१६.ऑगष्ट १९४५ मध्ये औद्योगिक वसाहतीचे नियम व मालकाच्या जबाबदार्या यावर विचारविनिमय करणार्या स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यात त्यांनी उद्योगासाठी मौलिक सूचना केल्या.

१७. ८ एप्रील १९४६ ला ‘मिका माईन्स लेबर वेल्फेअर फंडाची’ स्थापना करण्यासंबंधीचे बिल संमत केले.

१८. ‘इंडियन्स माईन्स (अमेंडमेंड) ऑर्डिनन्स १९४५’ नुसार स्त्री कामगारांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्था करण्याचे व्यवस्थापनावर बंधन घातले.

१९.`भारतिय खाण कायदा १९४६’ तयार करुन स्त्री कामगारांना खाणीत जमिनीच्या आंतमध्ये काम करण्यास व रात्रपाळीस बंदी केली.

२०.‘दि.माईन्स मॅटरनिटी बेनिफिट ऍक्ट’ नुसार खाणीतील स्त्रीयांना बाळंतपणाची (प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर) रजा देण्याची शिफारस केली.

२१.‘दि.फॅक्टरी अमेंडमेंट बिल’ संमत करुन कामगारांना १० दिवसाची पगारी रजा आणि बाल कामगारांना १४ दिवसाची पगारी रजा देण्यासंबंधी कायद्यात दुरुस्ती केली.

२२. १९४६ च्या बजेट सेशन मध्ये आठवड्याचे कामाचे तास ५४ वरुन ४८ व दिवसाला १० तासांऎवजी ८ तास करण्याचे बिल मांडले.

२३. अपघातग्रस्त कामगारांना मोबदला मिळावा म्हणून ‘कामगार भरपाई कायद्याची’ निर्मिती केली.

२४.२१ फेब्रुवारी १९४६ साली मध्यवर्ती कायदे मंडळात ‘दि इंडियन्स ट्रेड युनियन्स (अमेंडमेंड) ऍक्ट आणून ट्रेड युनियनला मान्यता देणे व्य्वस्थापनाला सक्तिचे करण्यासंबंधीचे विधेयक मांडले.

२५.१९ एप्रील १९४६ ला मध्यवर्ती कायदे मंडळात कमीत कमी मजुरी आणि कामगारांची संख्या किती असावी या संबंधी बिल मांडले व त्याचेच १९ फेब्रुवारी १९४८ ला कायद्यात रुपांतर झाले.

२६.बाबासाहेबांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यातील ‘मार्गदर्शक तत्व’ आर्टिकल ३९ (ड) नुसार पगारदार पुरुषा इतकाच पगार त्याच पदावर काम करणार्या स्त्रियांनाही मिळावा अशी घटनात्मक तरतूद केली.

२७.घटनेच्या कलम ४३ नुसार गर्भवती व बाळंत स्त्रियांसाठी कामाच्या ठिकाणी योग्य व सुरक्षित व्यवस्था ठेवण्याची तरतूद केली.

२८.कलम ४३ (अ) नुसार शासनाने कामगारांना व्यवस्थापनात सहभागी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी तरतूद केली.

२९.कलम ४३ नुसार शासनाने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व सांस्कृतिक संधी देण्यासाठी प्रयत्न करण्याची तरतूद केली.

३०.‘स्टेट्स ऍण्ड मायनॉरिटीज’ या ग्रंथामध्ये वेठबिगार कामगारांच्या प्रश्नाला हात घालतांना बाबासाहेब ‘वेठबिगार हा गुन्हा आहे’ असे मत मांडले आहे.

३१. कामगारांचे आथिक जीवनमान उंचावण्यासाठी स्वतंत्र मजूर पक्षाच्या जाहीरनाम्यात आर्थिक धोरण स्पष्ट केले. त्यातील आर्टीकल २ सेक्षन २ (४) मध्ये आर्थिक शोषणाच्या विरोधात स्पष्टीकरण केले. त्यात कामगारांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी संपत्तीची जास्तीत जास्त समान वाटणी करण्याबद्दल राज्याने प्रयत्न करावेत अशी सुचना केली.

३२. शेतीच्या प्रगतीसाठी व शेतकर्यांच्या उत्कर्षासाठी लॅंड मॉर्गेज बॅंक, शेतकर्यांची पतपेढी, खरेदी विक्री संघ इत्यादी स्थापण करण्याविषयी धोरण व्यक्त केले.

कामगार मित्रांनो. बाबासाहेबांचे वरील बहुमूल्य योगदान पाहतां आज कामगारांची जी सुस्थिती दिसत आहे, त्यात बाबासाहेबांचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे.

जय भीम

नमो बुद्धाय

दगडांच्या आणि काल्पनिक देवावर विश्वास ठेवणार्यांना माझा एक प्रश्न

दगडांच्या आणि काल्पनिक देवावर विश्वास ठेवणार्यांना माझा एक प्रश्न, कोणत्या दगडाच्या आणि काल्पनिक देवाने आजपर्यंत इतिहास रचला आहे का? मला तर माहित नाही पण आमेरीके वरून आलेल्या एका डॉंक्टरने इतिहास रचला आहे त्यांनी पेनाच्या जोरावर 33 कोटी देवांची नसबंधी करून ह्या देशातून आंधश्रद्धा घालवली आणि भारत देशात लोकशाही नांदवली आणि त्या महान डॉक्टरांचेच नाव आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

जय भीम

नमो बुद्धाय

-@विकास रोडे

दीन दुबळ्याची माऊली माता रमाई जयंतीनिमित्त रमाई मातेस कोटि कोटि वंदन तसेच विनम्र अभिवादन...... महामाता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपणास सर्वास मंगलमय शुभेच्छा


आईसाहेब रमाताई आम्बेडकर

प्रत्येक महापुरुष के पीछे उसकी पत्नी का बड़ा हाथ होता है.पत्नी का त्याग और सहयोग अगर न हो तो शायद, वह व्यक्ति, महापुरुष ही न बने.आईसाहेब रमाताई आंबेडकर इसी तरह के त्याग और समर्पण की प्रतिमूर्ति थी.अक्सर महापुरुष की दमक से सामने उसका घर-परिवार और घरवाली पीछे छूट जाते हैं. क्योंकि, इतिहास लिखने वालों की नजर महापुरुष पर केन्द्रित होती है.रमाताई के बारे में भी ज्यादा कुछ नहीं लिखा गया है.
रमाबाई का जन्म महाराष्ट्र के दापोली के निकट वणन्द गावं में सन 1899 में हुआ था. इनके पिता का नाम भीकू धुत्रे और माँ का नाम रुक्मणी था। महाराष्ट्र में कहीं-कही गावं का नाम भी जोड़ने का रिवाज है। इस रिवाज के अनुसार उन्हें भीकू वणनंदकर के नाम से भी पुकारा जाता था। भीकू वणनंदकर परिवार का पालन-पोषण बड़ी मुश्किल से कर पाते थे। वे कुलीगिरी का काम करते थे।
रमाबाई के बचपन का नाम रामी था। रामी की दो बहने और एक भाई था। बड़ी बहन गौरा और छोटी का नाम मीरा था। चारों भाई-बहनों में शंकर सबसे छोटा था। गौरा का ब्याह हो चूका था। बचपन में ही माता-पिता की मृत्यु हो जाने के कारण रामी और उसके भाई-बहन अपने मामा और चाचा के साथ मुंबई में आ कर रहने लगे थे। ये लोग भायखला की चाल में रहते थे।
रामी का विवाह 9 वर्ष की उम्र में सुभेदार रामजी सकपाल के सुपुत्र भीमराव आंबेडकर से सन 1906 में हुआ था। भीमराव की उम्र उस समय 14 वर्ष थी। तब, वह 10 वी कक्षा में पढ़ रहे थे। शादी के बाद रामी का नाम रमा हो गया था. शादी के पहले रमा बिलकुल अनपढ़ थी. किन्तु ,शादी के बाद भीमराव आंबेडकर ने उसे साधारण लिखना-पढ़ना सिखा दिया था. वह अपने हस्ताक्षर कर लेती थी।
रामजी सकपाल के परिवार में भीमराव के दो बड़े भाई आनंद राव, बलराम तथा तुलसा और मंजुला दो बहने थी. बालाराम की पत्नी का नाम लक्षी था. मुकुंदराव, बालाराम का पुत्र था। डा. आम्बेडकर रमा को 'रामू ' कह कर पुकारा करते थे।
भीमराव रामजी आम्बेडकर की सन 1924 तक पांच संताने हुई थी। बड़ा पुत्र यशवंत था। यशवंतराव का जन्म सन 1912 में हुआ था। गंगाधर नाम का पुत्र ढाई साल की अल्पायु में ही चल बसा था। इसके बाद रमेश नाम का पुत्र भी चल बसा था। इंदु नामक एक पुत्री हुई मगर, वह भी बचपन में ही चल बसी थी। सबसे छोटा पुत्र राजरतन की मृत्यु 19 जुला. 1926 को हुई थी।
चारों बच्चों की मृत्यु का कारण ये था कि बाबा साहब स्वतन्त्र जीविकोपार्जन के काम की तलाश में मारे-मारे फिर रहे थे। धनाभाव के कारण घर में हालत बहुत खराब थी। जब पेट ही पूरा नहीं भर रहा हो तो बच्चों की बीमारी के इलाज के लिए पैसे कहाँ से लाते ? यही कारण था कि यशवंत का इलाज भी ठीक से नहीं पाया था।
गंगाधर के मृत्यु की ह्रदय विदारक घटना का जिक्र करते हुए एक बार बाबा साहब ने बतलाया था कि ठीक से इलाज न हो पाने से जब गंगाधर की मृत्यु हुई तो उसकी मृत देह को ढकने के लिए गली के लोगों ने नया कपडा लाने को कहा। मगर, मेरे पास उतने पैसे नहीं थे। तब रमा ने अपनी साड़ी से कपडा फाड़ कर दिया था। वही मृत देह को ओढ़ा कर लोग शमशान घाट ले गए और पार्थिव शरीर को दफना आए।
बाबा साहब के सबसे बड़े पुत्र यशवंत राव ही जीवित रहे थे। वह भी बीमार-सा रहता था। रमा को और बच्चे की चाह थी मगर, अब और बच्चा होने से डाक्टर के अनुसार, उसे टी बी होने का खतरा था। इस तारतम्य में डाक्टर ने बाबा साहब को सावधानी बरतने की सलाह दी थी।
बडौदा की नौकरी के समय भीमराव के पिताजी की तबियत ठीक नहीं रहती थी। रमाई दिन-रात ससुर की सेवा और इलाज में लगी रही। लम्बी बीमारी के बाद बडौदा से भीमराव के लौटने के पहले ही वे चल बसे थे।
भीमराव आम्बेकर हमेशा ज्ञानार्जन में रत रहते थे। ज्ञानार्जन की तड़प उन में इतनी थी कि घर और परिवार का जरा भी उन्हें ध्यान नहीं रहता था। रमा इस बात का ध्यान रखती थी कि पति के काम में कोई बाधा न हो। वह पति के स्वास्थ्य और सुविधा का पूरा ध्यान रखती थी।
बाबा साहब पढ़ते समय प्राय: अन्दर से दरवाजा बंद का देते थे। रमा कई बार जोर-जोर से दरवाजा खट खटाती परन्तु दरवाजा नहीं खुलता तब थक हार कर वह लौट जाती। इस चक्कर में कई बार भूखे ही रह जाती थी। पति भूखा हो और वह भोजन कर ले, उसे मंजूर नहीं था। डाक्टर की सलाह अनुसार बाबा साहब भी रमा से दूरी बना कर ही रहते थे। कई बार घर नहीं आते थे, आफिस में ही रहते थे।
रमा की बड़ी बहन गौरा, छोटा भाई शंकर, विधवा जेठानी लक्ष्मी और उसका पुत्र मुकुंद साथ में ही रहते थे। आंबेडकर के शुरू का जीवन लम्बे आर्थिक तंगी का रहा था। शंकर कपड़ा मिल में मजदूरी करता था। तंगी की हालत ये थी कि दिन भर कोई मजदूरी करने के बाद साम को वह घर से तीन-चार की मी दूर तक जाकर गोबर बिन कर लाती थी। गोबर से घर में वह कंडे थापती और फिर उन्हें वह बेच आती। पास-पडोस की स्त्रियाँ टोकती कि बैरिस्टर की पत्नी होते हुए भी वह सिर पर गोबर ढोती है ! इस पर कहती कि घर का काम करने में लज्जा की क्या बात है ? रमाताई, घर का खर्च बड़ी किफायती से चलाती थी। बाबा साहब की पक्की नौकरी न होने से उसे काफी दिक्कत होती थी।
रमा एक सीधी-सादी और कर्तव्य-परायण स्त्री थी। पति और परिवार की सेवा करना वह अपना धर्म समझती थी। चाहे जो भी विपत्ति हो, किसी से सहायता लेना उसे गंवारा नहीं था। ऐसे कई मौके आए जब परिचितों ने उन्हें मदद की पेशकश की। किन्तु , रमा ने लेने से इंकार कर दिया।
रमाताई संतोष,सहयोग और सहनशीलता की मूर्ति थी। डा. आंबेडकर प्राय: घर से बाहर रहते थे। वे जो कुछ कमाते थे, उसे वे रमा को सौप देते और जब आवश्यकता होती, उतना मांग लेते थे। रमाताई घर खर्च चला कर कुछ पैसा जमा भी करती थी। क्योंकि, उसे मालूम था कि डा. आंबेडकर को उच्च शिक्षा के लिए पैसे की जरुरत होती है
बाबा साहब को पुस्तकें खरीदने का बेहद शौक था। वे इस मामले में पैसों की परवाह किए बिना पुस्तकें खरीद लेते थे। एक बार इंग्लैंड के कानून का पांच खंडों वाला ग्रन्थ उन्होंने 500 रूपए में खरीद लिया। घर आ कर खुश होते हुए वे रमा को बताने लगे कि कैसे बहुत ही सस्ते में उन्होंने ये पुस्तकें खरीदी है ? पुस्तके देख रमा ने कहा कि पति को पत्नी और घर-परिवार पर भी ध्यान देना चाहिए, ऐसा कुछ नहीं लिखा है क्या इन पुस्तकों में ? रमा उलाहने पर बाबा साहब मुस्करा देते।
रमाताई सदाचारी और धार्मिक प्रवृति की गृहणी थी। उसे पंढरपुर जाने की बहुत इच्छा रही। महाराष्ट्र के पंढरपुर में विठ्ठल-रुक्मनी का प्रसिध्द मंदिर है। मगर, तब हिन्दू-मंदिरों में अछूतों के प्रवेश की मनाही थी। आंबेडकर, रमा को समझाते थे कि ऐसे मन्दिरों में जाने से उनका उध्दार नहीं हो सकता जहाँ, उन्हें अन्दर जाने की मनाही हो। मगर, रमा नहीं मानती थी। एक बार रमा के बहुत जिद करने पर बाबा साहब पंढरपुर ले ही गए। किन्तु अछूत होने के कारण उन्हें मन्दिर के अन्दर प्रवेश नहीं करने दिया गया था।
डा. आम्बेडकर के आन्दोलनों में महिलाएं जम कर भाग लेती थी.रमाताई ने ऐसे कई आन्दोलनों और सत्याग्रहों में शिरकत की.दलित समाज के लोग रमाताई को 'आईसाहेब' और डा. आम्बेडकर को 'बाबासाहब' कह कर पुकारा थे. तब, बाबा साहब मुम्बई दादर के मकान राजगृह मे रह्ते द जो रेल्वे लाइन के निकट था। एक बार बाबासाहब के मित्र ने पुछ लिया कि उन्होने अपने रहने के लिए स्थान रेल्वे लाइन के इतना निकट क्यों चुना ? क्या इससे आपके ध्यान मे विघ्न नहीं पहुन्चता और पढाई मे बाधा नहीं पहुचती ? इस पर बाबा साहब कुछ कहते इसके पहले ही पास खडी रमा ने जवाब दिया था कि वे बेकार कि बात क्यों कर रहे है ? बडी मुश्किल से तो उन्होने मकान बनाया है। जहाँ तक बाबा साहब की बात है,

पिता की मृत्यु के बाद भीमराव उच्च शिक्षा के लिए विदेश जाते हैं. वे 1914 से 1923 तक करीब 9 वर्ष विदेश में रहते हैं.
इधर, ससुर की दिन-रात सेवा से जुझते-जुझते रमाताई खुद बीमार रहने लगी थी. बीमारी के हालत में भी रमाताई , डा. आंबेडकर की सुख-सुविधा का पूरा ध्यान रखती थी.उसे अपने स्वाथ्य की उतनी चिंता नहीं होती थी जितनी के पति को घर में आराम पहुँचाने की
डा. आंबेडकर अपने कामों में अत्यधिक व्यस्त रहने के कारण रमाताई और घर पर ठीक से ध्यान नहीं दे पाते थे. विदेश में रहने के बाद जब वे घर आते हैं तब वे रामी को बूरी तरह अस्वस्थ पाते हैं.
रमा ताई काफी लम्बे समय तक बीमार रही और अंतत: 27 मई 1935 में डा. आंबेडकर को अकेला छोड़ इस दुनिया से विदा हो गई. रमाताई के मृत्यु से डा. आंबेडकर को गहरा आघात लगा. वे बहुत रोये थे.

- @ Amrit Ukey

blog link :- http://amritlalukey.blogspot.in/2011/12/blog-post_4514.html?m=1

दीन दुबळ्याची माऊली माता रमाई जयंतीनिमित्त रमाई मातेस कोटि कोटि वंदन तसेच विनम्र अभिवादन...... महामाता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आपणास सर्वास मंगलमय शुभेच्छा...

जय भीम

लव भीम

नमो बुद्धाय

Thursday, 27 March 2014

१४ जुलै १९४१ ला बाबांची प्रकृती ठिक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदामंत्री होते.

एकदा एका महाराला त्याच्या मुलाचे पत्र आले. अनाडी महार धावत गावातील ब्राम्हणाकडे (कुलकर्णी) जाऊन ते पत्र वाचायला दिले. ब्राम्हणाने त्याच्या गैरफायदा घेतला. "माझे लाकडं फोडून दे मगच वाचून दाखवतो."
महाराने बरीच लाकडं फोडली तरी ब्राम्हणाने पत्र वाचून दाखवले नाही. महार विनंती करु लागला "काय लिहीले पत्रात? माझ्या पोरगा सुखी आहे ना हो?"
बारीक लाकडे फुटली होती पण गाठी असलेली लाकडे फुटत नव्हती. महार घामाघुम झाला. त्याने प्यायला पाणी मागितले पण ब्राम्हणाने पाणी पाजले नाही. मनाला वाटेल त्या शिव्या दिल्या. शेवटी महार म्हणाला "वाचायचं नसेल तर नका वाचू. मी गाठी फोडणार नाही." तेव्हा ब्राम्हण म्हणाला" गाठी फोड तेव्हाच पत्र परत देतो." ब्राम्हणाचे वाक्य ऐकूण महार परतणारच तेव्हढ्यात गाडगे बाबा पाऊल सरकवत पढे सरकले त्यांनी तो तमाशा पाहिला. हातची काटी बाजुला ठेवुन कुर्हाड हातात घेतली. मोट्या कष्टाने गाठी फोडल्या. आणी मग ब्राम्हणावर नजर रोखुन त्याला दम भरला"दादाजी देता का नाही या महाराचे पत्र."
असे होते गाडगे बाबा.

पंढरपुरात एकदा टिळकाचे भाषण होते. तेवढ्यात बाबा समोरुन येत होते. सगळ्यांच्या माना वळल्या. श्रोत्यांच्या मनातले ओळखुन टिळकाने बाबांना स्टेजवर आणले आणि दोन शब्द बोलायला सांगितले. टिळकाचे अथनी चे भाषण बाबांना ठाव होते. स्टेजवर येताच बाबांनी टिळकाच्या ब्राह्मण पंथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाले "टिळक महाराज मी चुकलो. आम्ही ह्यातभर तुमची कापडं धुतली, ईस्त्री केली. तवा आम्ही कसा मार्गदर्शन करु? महाराज काय बी करा पण आम्हाला बी ब्राह्मण करा."

गांधीने कित्येक सामाजिक आंदोलन बंद पाडुन स्वतच्या मनमर्जीचे निरर्थक आंदोलन चालविली. बाबांचे आंदोलन समाप्त करण्यासाठी गांधीने बाबांना भेट देण्याचा प्रयत्न केला. गांधीने निरोप पाठविला तेव्हा बाबा म्हणाले "मुझे क्या काम है उनसे. समाज का बहुत काम करना है. मेरे पास वक्त नही है."
तेव्हा गांधीने नवीन उपाय आखला. मुम्बई प्रांताचे प्रोविंशियल मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर या आपल्या चेल्याला बाबांना भेटण्यास सांगितले. हा तोच खेर होता ज्याने कधीतरी बाबांवर ढोंगी असल्याचा आरोप केला होता. मात्र नंतर त्याला बाबांची माफी मागावी लागली. बाबांच्या कार्याचे महत्त्व त्याला चांगलेच कळले.


१४ जुलै १९४१ ला बाबांची प्रकृती ठिक नव्हती. महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ. आंबेडकरांना गाडगे बाबांची खबर दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदामंत्री होते. आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्ली ला रवाना व्हायचे होते.बाबांच्या निरोप मिळताच त्यानी सर्व कामं बाजूला ठेवली. २ घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामी सह रुग्नालयात भेट द्यायला गेले. कोणाकडुन काही न घेणाय्रा बाबांनी बाबासाहेबांकडुन २ घोंगड्या स्वीकारल्या. पण म्हणाले "डॉ. तुम्ही कशाला आले? मी एक फकिर. तुमचा एक मीनीट महत्त्वाचा आहे. तुमचा किती मोठा अधिकार आहे."
तेव्ह बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचे अधिकार मोठा आहे."
या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रु होते. कारण असा प्रसंग पुन्हा जिवनात येणार नाही हे दोघेही जाणवत होते.
आज २३ फेब्रुवारी, गाडगे बाबांची जयंती. बाबांना क्रांतिकारी प्रणाम.

जय भिम

भीमा कोरेगाव चे युद्ध आम्हास आपल्या महापराक्रमाची आठवण करून देत आहे





भीमा कोरेगाव चे युद्ध आम्हास आपल्या महापराक्रमाची आठवण करून देत आहे...१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात पुण्यातील भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या कोरेगाव येथे झालेली लढाई आणि या लढाईत महारांनी गाजविलेले शौर्य हि संपूर्ण महार समाजाला अभिमानास्पद अशी घटना आहे.
महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भीमसैनिक या प्रेरणास्थानाला भेट देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही दरवर्षी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी यायचे.

१ जानेवारी पर्यत सर्व समाजा पर्यत आपल्या शूर-वीरांचा इतिहास गेलाच पाहिजे.

Share Share Share Share Share Share


भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव जिंकण्या
होते किती साथी
पेशवे ब्राम्हण विझले
महारांच्या पेटल्या वाती
नदीकाठी नदीतीरावर
पेश्वांचा केला भंग
ब्रिटिशाही सलाम करती
महारांचा विजयस्तंभ
आले किती अंगावर
मोजायला अंकच नाही
पुन्हा वाट्याला जावू नका
महारांना अंतच नाही
भीमा कोरेगावाची
नाही सांगत खोटी गोष्ट
पुण्याच्या गादीवरती
फक्त महारांचीच पोस्ट

जातीयवाद्यांच्या दाराला जाऊन भीक मागुन खासदारकी मिळवण्यापेक्श्या स्वाभिमानी हार परवडली.

आठवले जातीयवाद्यांच्या दाराला जाऊन भीक मागुन खासदारकी मिळवण्यापेक्श्या स्वाभिमानी हार परवडली.

पहा मीञांनो तुम्हाला काय वाटते ते पण कमेंट जरूर द्या? 

ज्या बाळ ठाकरे कधी ही लोकशाही मानली नाही सतत लोकशाही विरुद्ध जाऊन या देशात आराजकता माजवली आस्या बाळ ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयीचा फोटो आपल्या महापुरुष्यासोबत बसवला जातो हे कीतपत योग्य आहे???


हा पाहा महायुतीचा पराक्रम


ज्या बाळ ठाकरे कधी ही लोकशाही मानली नाही सतत लोकशाही विरुद्ध जाऊन या देशात आराजकता माजवली आस्या बाळ ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयीचा फोटो आपल्या महापुरुष्यासोबत बसवला
जातो हे कीतपत योग्य आहे???

महायुतीत राहून रामदास चा दास झालेल्यांना त्यांची जागा दाखवुन द्या

बाळ ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी चा फोटो महापुरुषासोबत लावला जातो आस्या घटनेचा जाहीर निषेध,,,

निषेध निषेध जाहिर निषेध महायुतीचा जाहीर निषेध..

झोपलात का भीमसैनिकांनो जागे व्हा... जागे व्हा
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
कोण मेलं,कोणी परदेशी गेलं!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
हवं होतं भारताला,लिहून संविधान
शोधून पाहिले देशी,विदेशी विद्वान!
मिळाले ना कोण,सुचीत झाले भिमनाम,
त्या सुचीताचे....... आव्हान स्वीकारलं!!...
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!!
गळले,पळाले कोण,मातीत मिळाले
जातीवादी होते सारे,भिमावर जळाले!
दानत त्यांची काळी निघाली!
त्यांनी जातीचच.....कारस्थान केलं!!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!
आठ सदस्यीय घटना,मसुदा समिती! अ
ध्यक्ष स्थानी झाली,भिमाची नियुक्ती!
कागदपञी झाले,सारे नामधारी!
त्यांनी भिमा संगती......काम नाकारलं!!
संविधान माझ्या एकट्या भिमानं लिहीलं!!!


!! जय भिम !!!

मासा पाण्याविना, सजीव सुर्याविना, जगू ,राहू शकत नाही,तसेच हा भारत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांच्या विचारा शिवाय जगू शकणार नाही,हे शाश्वत सत्य आहे..!!


मासा पाण्याविना, सजीव सुर्याविना, जगू ,राहू शकत नाही,तसेच हा भारत देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोन महापुरुषांच्या विचारा शिवाय जगू शकणार नाही,हे शाश्वत सत्य आहे..!!

दगड देवाला पुजनार्या माझ्या बहुजन समाजातील बंधूंनो माझ्या वरिल प्रशनांचे उत्तर द्या नाहीतर तुमच्या घरातील देवारा उकीरड्यावर टाकून द्या..



कृपया पुरी पोस्ट पढ़ें

1. जब तुमको गाँव से बाहर बस्ती बनाकर रहने के लिए मजबूर किया गया था । तब 5000 साल तक आपका भगवान कहाँ था ?

2. जब आपको 5000 साल तक शिक्षा से वंचित रखा गया तब आपका भगवान कहाँ था ?

3. जब 5000 साल तक आपको संपत्ति रखने का अधिकार नहीं था तब आपका भगवान कहाँ था ?

4. जब आपको गले में हांड़ी लटकाकर चलने के लिए मजबूर किया गया तब पाँच हजार साल तक आपका भगवान कहाँ सोया हुआ था ?

5. जब पाँच हजार साल तक आपको पीछे झाड़ू बाँधकर चलने के लिए मजबूर किया गया तब आपका भगवान कहाँ था ?

6. जब आपके प्राणों का मूल्य कुत्ते, बिल्ली, मेंढक के प्राणों के बराबर समझा जाता था तब पाँच हजार साल तक आपका भगवान कहाँ था ?

7. जब आपको सुबह शाम चलने पर प्रतिबन्ध था सिर्फ दोपहर को कोई थाली वगैरह बजाते हुए चलने दिया जाता था तब आपका भगवान कहाँ था ?

8. जिस पानी में कुत्ते बिल्ली मल मूत्र विसर्जित करते रहते थे उसी पानी को आपको पीने नहीं दिया जाता था । तब आपका भगवान कहाँ था ?

9. जब आपकी बहू बेटियों को किसी जानवर की तरह कोई भी ले जा सकता था तब आपका भगवान कहाँ था ?

10. जब आपको सिर्फ काम कराने के लिए बंधुआ मजदूर की तरह प्रयोग किया जाता था तब आपका भगवान कहाँ था ?

11. जब आपको मंदिर में नहीं घुसने दिया जाता था तब आपका भगवान कहाँ था ?

12. जब आपको धर्म कर्म से वंचित रखा गया था तब आपका भगवान कहाँ था ?

13. जब आपके छूने से ही ये लोग अपवित्र हो जाते थे तब आपका भगवान कहाँ था ?

14. जब कोई तुम्हारी बीमारी का इलाज तुम्हारी जाति की वजह से करने से इंकार कर देता था और तुम इलाज के आभाव में तड़प तड़पकर दम तोड़ देते थे तब आपका भगवान कहाँ था ?

15. जब पानी के अभाव में तुम प्यासे ही तड़प तड़पकर दम तोड़ देते थे तब तुम्हारा भगवान कहाँ था ? आज जब भारतीय संविधान के वजह से जब आपको इन सबसे मुक्ति मिल गयी और अधिकार मिल गए तो तुम्हारे करोडो भगवान पैदा हो गए ?

दगड देवाला पुजनार्या माझ्या बहुजन समाजातील बंधूंनो माझ्या वरिल प्रशनांचे उत्तर द्या नाहीतर तुमच्या घरातील देवारा उकीरड्यावर टाकून द्या..

जय भीम

लव भिम

नमो बुद्धाय

जय प्रबुद्ध भारत

आज वरळीत ज्या ठिकाणी कामगार राज्य विमा मंडळाचे 'कामगार हॉस्पिटल' उभे आहे.

आज वरळीत ज्या ठिकाणी कामगार राज्य
विमा मंडळाचे 'कामगार हॉस्पिटल' उभे आहे.
त्या मैदानाला पूर्वी 'काळे मैदान ' असे संबोधिले
जात होते. त्या मैदानावर प.पु.बाबासाहेब
आंबेडकरांची जाहीर सभा होती. काळ असेल
१९५२-५३ चा, संपूर्ण मैदान लोकांनी फुलून गेले
होते. रस्त्यावर देखील लोकांना उभे राहण्यास
जागा नव्हती . दुपारपासूनच लोकांचे थवेच्या थवे
हातात निळे झेंडे घेवून, बाबासाहेबांचा जयजयकार
करीत मैदानात जमा झाले होते.
सभा संध्याकाळी सुमारे पाच वाजता सुरु झाली.
अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
शेकडो लोकांनी बाबासाहेबांना हार घातले.
घोषणांच्या जयजयकारांत बाबासाहेबांचे भाषण सुरु
झाले. प्रत्येक माणूस भारावल्याप्रमाण े जिथे
जागा मिळेल तिथून अत्यंत शांतपणे
बाबासाहेबांचा एक एक शब्द हृदयात कोरून ठेवत
होता. एकूण एक माणूस बाबासाहेबांचे रुबाबदार
सौंदर्य डोळ्यात साठवत होता. एकही माणूस
जागचा हलत नव्हता . बाबासाहेब पण तल्लीन
होऊन बोलत होते. इतक्यात
स्टेजच्या उजव्या बाजूला,
रस्त्याच्या कडेला काहीसा गोंधळ झाला.
स्टेजच्या उजव्या बाजूची माणसे पटापट
उभी राहिली .बाबासाहेबांनी सर्वांनी बसण्याची आज्ञा केली.
सभा पूर्वपद शांत झाली आणि स्टेजसमोर वर
केलेल्या दोन्ही हातात हार घेवून महान संत गाडगे
महाराज ,बाबासाहेबांसमो र उभे तेच ध्यान !
सतराशेसाठ ठीगळांचे अंगावर कपडे,
आणि डोक्यावर मडके. अचानक गाडगे
बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर
केलेल्या दोन्ही हातात हार घेवून स्टेजसमोर
उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब
म्हणाले.- 'बाबा ! तुम्ही खाली का उभे ? वर
या ना ' ' गाडगे बाबा म्हणाले :- तुम्हीच
खाली या आणि या अडाण्याचा हार घ्या ' '
बाबासाहेब म्हणाले :- तुम्ही अगोदर वर या मग
मी हार घेईन !' ' गाडगेबाब म्हणाले :-
नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या !' बराच
वेळ ते दोन महापुरुष एकमेकांना विनंत्या करीत
होते. बाबासाहेबांच्या भाषणाची तार तर
तुटली होती.वेळ होत होता म्हणून बाबासाहेब
जरा रागातच म्हणाले , ' बाबा तुम्ही, स्टेजवर
का येत नाही ?' त्यावर ते संतशिरोमणी, निष्काम
कर्मयोगी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र
आवाजात बोलले ..... 'बाबासाहेब !
तुम्ही स्टेजजवळ उभे आहात , त्या स्टेजला पाय
लावायची माझी तरी लायकी नाही .'
संतशिरोमणी बाबांच्या तोंडून असे बोल बाहेर
पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले .
त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली .
दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली.
' आता , तुमचे चालू द्या !' असे बोलून क्षणात
गाडगे महाराज निघून गेले. याला म्हणतात
एका निष्कलंकित चारित्र्याने दुसऱ्या निष्कलंकित
चारित्र्याची केलेली कदर ! संतांचा निरोप घेऊन
बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य !
स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या . सर्व नेते व
कार्यकर्त्यांनी खाली प्रेक्षकांत बसणे पंसंद केले.
बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते
आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.

जय भीम

ज्या घरात निर्जीव दगडा पुढे हात पसरवायची प्रथा असते त्या घरात कधी भिम योध्दा जन्माला येत नसतो

स्वर्गाच्या आपेक्षेनं जगणाऱ्यांच्या घरात
कधी वैज्ञानिक जन्माला येत नसतो,
धुप अंगाऱ्यावर विश्वास ठेवणाऱ्याच्या घरात
कधी डाँक्टर जन्माला येत नाही,
काल्पनीक विश्वात जगनाऱ्याच्या घरी
कधी इंजिनीअर जन्माला येत नसतो,
ज्यांची मानसिकता फक्त स्वताः पुरती मर्यादित आसते त्या घरात कधी
शिक्षक जन्माला येत नाही,
ज्या घरात निर्जीव दगडा
पुढे हात पसरवायची प्रथा असते
त्या घरात कधी भिम योध्दा
जन्माला येत नसतो, आणि
हे या देशाच दुर्दैव आहे
कि नेमकं हेच शिक्षण आम्हाला
दिलं जात जन्म देणाऱ्या आई
वडिलांना सोडुन आणि समस्त
बहुजनाला माणसात आणणार्या
बाबासाहेबांना सोडुन, दगडांशी
नात जोडलं जातं मग
"घरात बाबासाहेब "
जन्माला यायची अपेक्षा ठेवायची कशी

जय भिम

हिंन्दू धर्मिय महाशिवरात्र हा उत्सव साजरा करण्यासाठी कान्हेरी बुद्ध लेणी येथे

जमून, बुद्ध लेणी व स्तुपावर शिवलिंग समजून नारळाचा मारा करतात.

त्यामुळे आपल्या बुद्ध मुर्तीची व स्तुपाची हानी होत आहे. तरी हे वेळेत

थांबवणे गरजेचे आहे. नाहि तर २००० वर्षापासून अस्तित्वात असलेल्या

लेण्या इतिहासात जमा होतील. त्या करीता आपण सर्वांनी संघटित होउन एक

यशस्वी प्रयत्न करुया. भारत लेणी संवर्धन समिती ह्यांनी गेल्या ५ वर्षापासून सुरू केलेल्या लढ्या मध्ये लांखोच्या संख्येने सामील व्हा. दिनांक २७ फेब्रुवारी

२०१४ सकाळी ठिक ७.०० वाजल्या पासून सांयकाळी ५.०० वाजे पर्यत.

"महाधम्म महोउत्सव" स्थळ:- कान्हेरी बुद्ध लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

बोरीवली(पुर्व).

संपर्क:-
संजय किर्तीकर ८१०८४२७८४४
दिपक हनवते ८६८९८४०७७७
विशाल खरात ९८३३७३९७१४

जय भीम

लव भिम

नमो बुद्धाय

जय प्रबुद्ध भारत