आज वरळीत ज्या ठिकाणी कामगार राज्य
विमा मंडळाचे 'कामगार हॉस्पिटल' उभे आहे.
त्या मैदानाला पूर्वी 'काळे मैदान ' असे संबोधिले
जात होते. त्या मैदानावर प.पु.बाबासाहेब
आंबेडकरांची जाहीर सभा होती. काळ असेल
१९५२-५३ चा, संपूर्ण मैदान लोकांनी फुलून गेले
होते. रस्त्यावर देखील लोकांना उभे राहण्यास
जागा नव्हती . दुपारपासूनच लोकांचे थवेच्या थवे
हातात निळे झेंडे घेवून, बाबासाहेबांचा जयजयकार
करीत मैदानात जमा झाले होते.
सभा संध्याकाळी सुमारे पाच वाजता सुरु झाली.
अनेक कार्यकर्त्यांची भाषणे झाली.
शेकडो लोकांनी बाबासाहेबांना हार घातले.
घोषणांच्या जयजयकारांत बाबासाहेबांचे भाषण सुरु
झाले. प्रत्येक माणूस भारावल्याप्रमाण े जिथे
जागा मिळेल तिथून अत्यंत शांतपणे
बाबासाहेबांचा एक एक शब्द हृदयात कोरून ठेवत
होता. एकूण एक माणूस बाबासाहेबांचे रुबाबदार
सौंदर्य डोळ्यात साठवत होता. एकही माणूस
जागचा हलत नव्हता . बाबासाहेब पण तल्लीन
होऊन बोलत होते. इतक्यात
स्टेजच्या उजव्या बाजूला,
रस्त्याच्या कडेला काहीसा गोंधळ झाला.
स्टेजच्या उजव्या बाजूची माणसे पटापट
उभी राहिली .बाबासाहेबांनी सर्वांनी बसण्याची आज्ञा केली.
सभा पूर्वपद शांत झाली आणि स्टेजसमोर वर
केलेल्या दोन्ही हातात हार घेवून महान संत गाडगे
महाराज ,बाबासाहेबांसमो र उभे तेच ध्यान !
सतराशेसाठ ठीगळांचे अंगावर कपडे,
आणि डोक्यावर मडके. अचानक गाडगे
बाबांना पाहून बाबासाहेब देखील अचंबित झाले. वर
केलेल्या दोन्ही हातात हार घेवून स्टेजसमोर
उभ्या असलेल्या गाडगे महाराजांना बाबासाहेब
म्हणाले.- 'बाबा ! तुम्ही खाली का उभे ? वर
या ना ' ' गाडगे बाबा म्हणाले :- तुम्हीच
खाली या आणि या अडाण्याचा हार घ्या ' '
बाबासाहेब म्हणाले :- तुम्ही अगोदर वर या मग
मी हार घेईन !' ' गाडगेबाब म्हणाले :-
नाही बाबासाहेब, तुम्हीच आधी खाली या !' बराच
वेळ ते दोन महापुरुष एकमेकांना विनंत्या करीत
होते. बाबासाहेबांच्या भाषणाची तार तर
तुटली होती.वेळ होत होता म्हणून बाबासाहेब
जरा रागातच म्हणाले , ' बाबा तुम्ही, स्टेजवर
का येत नाही ?' त्यावर ते संतशिरोमणी, निष्काम
कर्मयोगी गाडगे महाराज शांतपणे स्नेहाद्र
आवाजात बोलले ..... 'बाबासाहेब !
तुम्ही स्टेजजवळ उभे आहात , त्या स्टेजला पाय
लावायची माझी तरी लायकी नाही .'
संतशिरोमणी बाबांच्या तोंडून असे बोल बाहेर
पडताक्षणीच बाबासाहेब मंचावरून खाली उतरले .
त्या महान संतांची पुष्पमाला स्वीकारली .
दोघांनी एकमेकांना प्रेमाने कडकडून मिठी मारली.
' आता , तुमचे चालू द्या !' असे बोलून क्षणात
गाडगे महाराज निघून गेले. याला म्हणतात
एका निष्कलंकित चारित्र्याने दुसऱ्या निष्कलंकित
चारित्र्याची केलेली कदर ! संतांचा निरोप घेऊन
बाबासाहेब मंचाकडे वळले तर काय आश्चर्य !
स्टेजवरील सर्व खुर्च्या रिकाम्या . सर्व नेते व
कार्यकर्त्यांनी खाली प्रेक्षकांत बसणे पंसंद केले.
बाबासाहेब एकटेच मंचावरून भाषण देत होते
आणि श्रोते मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.
जय भीम

No comments:
Post a Comment