डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57 महापरिनिरवान दिनी बाबासाहेबाना आभिवादन
करण्यासाठी लाखो आंबेडकरी आणुयायी देश विदेशातुन आले, त्यात आनेक राजकारणी
लोक पण आले, पण जसे बाळ ठाकरे कधी चैत्यभुमी वर आले नाहीत तसेच त्यांचे पुञ
उद्धव ठाकरे पण चैत्यभुमी वर आले नाहीत पण तेथे त्यांचे banners आणि
hording तेथे होते आणि ते तेथे आले नाहीत याचा पण काही फरक पडत नाही म्हणजे
सांगण्याचा तात्परय हे आहे की ज्या बाळ ठाकरे ने
आयुष्यभर बाबासाहेबांचा द्वेष केला, शिवसेनेने केलेली प्रत्येक गोष्ट ही
घटना विरोधी म्हणजेच लोकशाही विरोधी केली, विद्यापिठ नामांतराला कायमच
विरोध केला, घरात नाही पिठ मागतात विद्यापीठ, मराठवाड्याचा का महारवाडा
करायचा आहे का, आसे जातीयवादक विधाने करून नामांतर लढ्यात मराठवाडा कायमच
धगधगत ठेवला, बाबासाहेबांच्या स्मारकाला कायमच विरोध दर्शविणारे आसे बाळ
ठाकरे पण याच बाळ ठाकरे ( शिवसेना ) सोबत राजकीय युती करणारे रामदास आठवले
सारखे आपलेच काही नेते आंबेडकरी समाजात त्यांना मोठे करत आहेत, आठवले
म्हणतात की बाळ ठाकरे चे स्मारक झाले पाहिजे आणि त्यांच्या स्मारकाला जागा
द्यावी, पण आठवलेनी सांगावे की बाळ ठाकरे चे स्मारक का? आणी कशासाठी? का
तुमचा राजकीय स्वारथ साधण्यासाठी? कीती दिवस तुम्ही आंबेडकरी समाजाला मुरख
बनवणार आहात, कीती दिवस तुम्ही बाबासाहेबांच्या नावाने तुमचे स्वार्थि
राजकारण चालवणार आहात? सर्वाना माहित आहे की इंदु मिल मिळावी म्हणुन कोणी
आंदोलन केले, कोण रस्त्यावर उतरले, कोणी लाठ्या काठ्या खालल्या मग हा श्रेय
घेण्याचा प्रकार कशासाठी, सहा डिसेंबर हा आपल्यासाठी दुःखाचा दिवस, तरी
तुम्ही याच दिवसि इंन्दु मिलच्या जागेत स्मारकाचे भुमीपुजन करता हा देखावा
कशासाठी, तुमचा राजकीय स्वारथ साधण्यासाठी कारण तुम्हाला पण माहित आहे
महापरीवरीनिरवान दिनी लाखो लोक बाबासाहेबाना आभिवादन करण्यासाठी येतात
म्हणजे तेथे पण तुमचा राजकीय स्टंट आसतो हे कशासाठी ?का तुम्हाला 6 डिसेंबर
च्या आगोदर आणि नंतर कोणता दिवस नव्हता का? आठवले बस करा आता समाज जागृत
झाला आहे त्याना विट आला आहे तुमच्या आसल्या राजकारणाचा.आदरणीय बाळासाहेब
आंबेडकर म्हणतात की जातीवादक, घटनाविरोधी, लोकशाही विरोधी बाळ ठाकरे च्या
स्मारकाला आमचा कायमच विरोध राहिल, आणि माझ्या सारख्या तमाम भीमसैनिकांचा
जातीवादक माणसाच्या स्मारकाला विरोध राहिल यात शंका नाही.शिवसेना आणि
भाजपा यांच्या सोबत युती करण्याचा आगोदर तुम्हांला आठवले विचार पडला नाही
का, घटना बदलाय नीघालेली भाजपा, आणि घटना विरोधी शिवसेना, नामांतर लढ्यात
जे शहीद झाले त्यांचे खून करणारी पण हीच शिवसेना होती,रमाबाई हत्याकांडातील
त्या psi ला पाठिशी घालणारी पण हीच ती शिवसेना होती तरीपण तुम्ही हात
मिळवणी यांच्यासोबत करता? का आणि काशाशाठी फक्त एका खाशदारकी साठी ? तुम्ही
banner त्या बाळ ठाकरे चे आणि उद्धव ठाकरे चे चैत्यभुमि वर, त्याने काय
होते, त्यांनी कधी येउन अभिवादन केले का बाबासाहेबांना चैत्यभुमि वर? नाही
केले याचा अर्थ बाबासाहेबा विषयी त्यांचा द्वेष आणखीन पण तसाच आहे,
बाबासाहेबानी जे ताठ मानेनी जागाय शिकवलंय हे पण तुम्ही विसरलात का ? पण
तुम्हाला हे कळणार नाही तुम्ही तुमचा स्वाभिमान घाण ठेवला आहे. त्या
शिवसेना आणि भजापा कडे ते पण एका खासदारकी साठी, कदाचित तुम्हाला खासदारकी
मिळेल, पण हा आंबेडकरी समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही हे लक्षात
असुद्या.
जय भिम
विकास रोडे
जय भिम
विकास रोडे
No comments:
Post a Comment