भारतात
अनेक पकारच्या लढाया झाल्या. पण महाराष्ट्रातील पुणे जिह्यात
भिमाकोरेगाव
येथे पेशवे विरूद्ध महारसैनिक जी लढाई झाली `ती न भुतो न भविष्यती' होती.
म्हणजे अशी लढाई मागे ही झाली नाही आणि पुढेही कधी होणार नाही. या लढाईत
500 महारसैनिकांनी 25000 हजार पेशव्यांचा धुव्वा उडविला तर काही जायबंदी
करून टाकले तर काहींना धरणीवर लोळविले, काहींचे मुडदे पाडले, तर काहीजणांना
पळती भूई थोडी करून टाकली. अशा पद्धतीन
धाडसी शुर, वीर, जाबाज महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण करून टाकली. आजही
या लढाईची आठवण महारसैनिक म्हणजे आजचे भिमसैनिक यांच्या स्मरणात आहे. ही
लढाई का घडली? कशी घडली? आणि कोठे घडली? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. ही
लढाई घडण्यापूर्वी पेशव्यांना पुणे काबिज करावयाचे होते. पेशव्यांकडे
धारदार शस्त्रास्त्रs, तलवारी, भाले, कुऱहाडीही होत्या. 25000 पेशव्यांचा
फौज फाटा पुणे काबिज करण्यासाठी चालून येत आहे. याची कुणकुण गोऱया
अधिकाऱयांना आधीच लागली होती. 25000 पेशव्यांचा फौज फाटा म्हटल्यानंतर
सहाजिकच काळजाचे ठोके वाढणारच, काळजात धस्स होणारच. पुणे आणि नगर रस्त्यावर
असलेले भिमाकोरेगावच्या रस्त्यांनी एक गोरा शिपाई पुण्याहून शिरूरला
निघाला होता. त्या शिपायास कमांडर बटर्नरचे पत्र शिरूर छावणीला पोचवायचे
होते. त्याकाळात वाहनांची फारशी सुविधा नव्हती. हत्ती किंवा घोडे या
पाण्यांचा वापर त्यावेळस होत असे. सगळीकडे घनदाट जंगल होते. हत्ती, वाघ,
सिंह, लांडगे, कोल्हे, कुत्रे यापासून जीवाचे रक्षण करणे महत्वाचे होते.
अचानक एक गोरा शिपाई शिरूर छावणीत त्याचे आगमन झालेले पाहून शिरूर छावणीचे
गोरे अधिकारी ही अचबिंत झाले. त्या गोऱया शिपायाने मी कमांडर बटर्नरचे
पत्र घेऊन आलो असल्याचो सांगितले. बटर्नरचे पत्र वाचल्यानंतर शिरूर
छावणीतील गोऱया अधिकाऱयांना घाम सुटला. लेफ्टनंट कर्नल फिल्समन या गोऱया
अधिकाऱयांना पत्र वाचल्यानंतर जो घाम सुटला आणि जी त्यांची दयनीय अवस्था
झाली ती खरोखरच पाहण्यासारखी होती. अतिशय कडाक्याची थंडी असूनही त्याला घाम
सुटला होता. जणु तो काही घामाने न्हाऊनच निघाला होता. असे काय होते त्या
पत्रामध्ये लिहिलेले. त्या पत्रामध्ये कमांडर बटर्नर कळविले होते की, दुसरा
बाजीराव पेशवा 25000 सैन्य घेऊन पुणे काबिज करण्यासाठी येत आहे.
शस्त्रास्त्रासह तो अफाट फौज घेउढन येत आहे. पुण्याकडे आगेकुच करत आहे.
तेव्हा पुण्यातील ब्रिटीश आर्मीकडे फौज कमी आहे. तुम्हीसुद्धा फौज फाटा
घेऊन यावे. सध्या चाकणे या ठिकाणी पेशव्यांची फौज तळ ठोकून आहे. तर पेशवे
सैनिकांच्या पाठीमागे जनरल स्मिथ आपल्या फौजेनिशी पाठलाग करत आहे. लेफ्टनंट
कर्नल फिल्समनने सर्व पत्र वाचले आणि तो स्वतशीच विचार करू लागला. येणाऱया
पसंगाला कसे तोंड द्यायचे असा तो विचार करू लागला. पेशव्यांना भूईसपाट
करण्यासाठी जर कुठली शुर, वीर, आणि धाडसी जमात असेल तर ते फक्त महार सैनिक
आहे हे त्याच्या लक्षात आले. लेफ्टनंट कर्नल फिल्समन महारसैनिक असलेल्या
बॉम्बे इन्फंट्रीच्या पहिल्या रेजिमेंटची दुसरी बटालियन त्याला डोळ्यासमोर
दिसू लागली. त्याने क्षणाचाही विलंब न लावता पुढील कारवाई त्वरीत सुरू
केली. या महारसैनिक असलेल्या बटालियनमध्ये 500 महारसैनिक होते.
फिल्समन कर्नल फिल्समन यांच्या नेतृत्वाखाली शिरूर ते कोरेगाव येथपर्यंत पायी चालत आले होते. पेशव्यांना धुळ कशी चारायची याचीही योजना करण्यात आली होती. ही लढाई डोंगरावर किंवा कोणत्या किल्ल्यावर होणार नव्हती तर ही लढाई समोरासमोर सपाट जमिनीवर होणार होती. ब्रिटिश सैनिकांची आणि पेशव्यांची भेटगाठ भिमाकोरेगाव येथे पडली. आणि येथून पुढे जे घडले त्याची कोणी कल्पनाही करणार नाही. पेशव्याच्या अफाट सैनिकांनी महारसैनिकांवर हल्ला चढविला त्यावेळी महारसैनिक बेसावध होते. पेशवे कोणत्याही क्षणी हल्ला करतील याची त्यांना कल्पना होतीच. महारसैनिकांनी अत्यंत चालाखीने पेशव्यांना घेरले. धाडसी शुर, वीर, महारसैनिक ही आपल्या जिवाची पर्वा न करता पेशव्यांच्या सैनिकावर तुटून पडली. तलवारीला तलवारी भिडल्या होत्या. सपासप एकदुसऱयावर वार होत होते. पेशव्यांचे मुडदे पडल्या जात होते. एकटा म्हणजे एक महारसैनिक 40 ते 50 पेशवे सेनिकाबरोबर लढत होते. आपल्या जिवाची पर्वा न करता महारसैनिक शत्रु वर तुटून पडले होते. छातीला छाती भिडवून, तलवारीला तलवार भिडवून, न घाबरता न डगमता, शत्रूवर वार करून त्यांना धरणीवर लोळवले जात होते. आणि घरादाराची बायकापोरांची पर्वा न करता ते शत्रुशी लढत होते. डर, भीती, म्हणजे काय हे महार सैनिकांना माहित नव्हते. बस शत्रूचा नायनाट कसा करायचा, हे त्यांना माहित होते. शेवटचा श्वास असे पर्यंत महारसैनिक लढत होते. जिकडे बघावे तिकडे पेशव्यांचे मुडदे पडलेले होते. कुणाचा हात, तर कुणाचे डोके कलम करण्यात आले होते. एवढ्यात ब्रिटीश सैनिकाने आपल्या कमांडरास माघार घेण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा या घटनेची कुणकुण महारसैनिकांना लागली तेवढ्यात एक महारसैनिक जोरात कडाडला , `साहब, डरो मत... और भागने की मत सोचो... ये महार सैनिक अपने जान की बाजी लगा देंगे' हे धाडसी शुरवीर महारसैनिकांचे विचार ऐकून ब्रिटीश अधिकाऱयांचा उत्साह अजुनच वाढला. महारसैनिक किती बलवान शक्तीशाली शुरवीर आणि धाडसी आहेत. हे ब्रिटीश सैन्यांनाही कळून चुकले होते. महारसैनिक आणि पेशव्यात तुंबळ युद्ध सुरूच होते. जवळपास महारसैनिकांनी पेशव्यांची दाणादाण उडवली होती. अनेकांना धरणीवर लोळविले होते. ब्रिटीश सैनिक थोड्याफार पमाणात डगमगत होते. पण महारसैनिक मुळीच डगमगत नव्हते. उलट महारसैनिक कडाडले `साहेब आखरी गोली आखरी दुश्मन ' शेवट दुश्मनला शेवटच्या गोळीने आम्ही ठार करू.
महारसैनिक मरणाला कधीच घाबरत नाही. तलवार, चालाखबुद्धी आणि मनगटाच्या जोरावर लढाई चालूच ठेवली. तलवारीला तलवार भिडत असलेल्या आवाज सैनिकांच्या कानात गुंजत होता. घनघोर चाललेल्या लढाईत सैनिकांच्या अंगातून घामाच्या धारा निथळत होत्या. बरेच सैनिक रक्ताने माखले होते. या लढाईत पेशव्यांचा सरसेनापती बापू गोखले यांचा थोरला मुलगा बाबा लढाईत मारला गेला होता. त्यामुळे ही खबर बापू गोखल्यांच्या कानावर पडली त्यामुळे पेशवे सैनिक घाबरून विचलीत झाले होते. त्यांचे अवसान गळून पडले. बापू गोखलेंनी आपल्या मुलाचा देह मांडीवर ठेवला आणि तो मोठमोठ्याने हांबरडा फोडू लागला. सुर्य उगवले का असतांनाही त्याला अंधार वाटू लागला होता. त्यामुळे पेशव्यांचे उरले सुरले सैनिक घाबरून जिकडे रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा पळू लागले. पळण्यात आपली भलाई आहे नाही तर महारसैनिक आपल्याही ठार करतील. अशापद्धतीने पेशव्यांचा हजारो सैनिकांची महारसैनिकांनी दाणादाण उडवली तर काहींना पळती भूई थोडी करून टाकली. बापू गोखल्यांचा थोरला मुलगा या लढाईत मारला गेल्यामुळे बापू गोखल्यांची स्थिती नाजुक आणि भित्रत झाली होती.
ही लढाई 1 जानेवारी 1818 रोजी घडली. पेशव्यांनी केलेल्या जुलमांचा हा एकपकारे बदलाच होता. आधीच महार सैनिकांच्या उरात अन्याय आणि अत्याचाराची आग धगधगतच होती. कधीतरी ह्या आगीने अन्याय, अत्याचार करणाऱयांना धडा शिकवायचाच होता आणि तसेच घडले. या लढाईत जाबाज महारसैनिकांनी आपल्या जीवाचे रान करून त्याग आणि बलिदान देऊन भिमा कोरेगावच्या युद्धात विजय मिळवून दिला. आम्हाला आणि बहुजन समाजाला सार्थ अभिमान राहिल.
शिवाजी कांबळे
पेशवेशाहीचा पाडाव करून समाजाला व्रर्णव्यास्थेतून मुक्त करणाऱ्या महार बटालीयनच्या शूरवीरांना माझे क्रांतिकारक अभिवादन !
जय भिम

No comments:
Post a Comment