Monday, 24 March 2014

" सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची, संपली नाही लढाई नामांतर लढ्याची”



- घरात नाही पिठ मागतात विद्यापिठ.

- बाबासाहेब आंबेडकर हे निजामाचे हस्तक होते.

- मराठवाड्याचा का महारवाडा करायचा आहे का?

- महारांनी आमच्या नोकर्या पळवल्या आहेत.

- शहीद गौतम वाघमारे ला बेवडा संबोधुन शहिद गौतम वाघमारेची टिंगल केली

-@ बाळ ठाकरे ( शिवसेना )

आसे कित्येक प्रक्शोभक वक्तव्य करून ज्या बाळ ठाकरे ने मराठवाड्यात सतत जातीय
दंगली घडवल्या.

- मराठवाड्यातील ३५० घरांवर हल्ले झाले,

-३४०० कुटुंबाची धूळधाण झाली.

-२१०० घरे बेचिराख झाली.

-९२५ स्त्रियांवर बलात्कार झाले.

-२४० आंबेडकरी लोक जीवानाशी मारले गेले.

(हि सर्व आकडेवारी त्या काळातील प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांतील आहे, माझ्या मनाची नाही.)

त्यांच्याच मांडिला मांडि लावून बसलेले आपलेच रामदास आठवले सारखे काही आपलेच स्वार्थी पुढारी आपले संधीसाधु राजकारण करत आहेत तसेच आंबेडकरी समाजावर थोपवत आहेत ते पण एका खासदारकी आणि एका मंञिपदा साठी स्वतःहाची पोळी भाजून घेण्यासाठी त्यांची धरपड सरू आहे. हेच रामदास आठवले म्हणतात की बाळ ठाकरे चा विद्यापीठ नामांतराला विरोध नव्हता . मग आठवलेनी सागावे की,

- घरात नाही पिठ मागतात विद्यापिठ.

- बाबासाहेब आंबेडकर हे निजामाचे हस्तक होते.

- मराठवाड्याचा का महारवाडा करायचा आहे का?

- महारांनी आमच्या नोकर्या पळवल्या आहेत.
- शहीद गौतम वाघमरेला बेवडा संबोधुन शहीद गौतम वाघमारेची टिगल उडवली.

-@ बाळ ठाकरे ( शिवसेना )

रामदास आठवलेंनी उत्तर द्यावे की हे वक्तव्य बाळ ठाकरेचे नाहीत ??

मग खालील भीमसैनिक उगाच शहीद झाले का?

नामांतर आंदोलनातील शहीद भीमसैनिक:-
गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे, अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर, ज्ञानेश्वर साखरे, डोमाजी कुत्तरमारे, चंदर कांबळे, जनार्दन मवाळे, शब्बीर अली काजल हुसैन, रतन मेंढे, सुहासिनी बनसोड, नारायण गायकवाड, अब्दुल सत्तार, दिवाकर थोरात, जनार्दन मस्के, भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे, प्रतिभा तायडे, गोविंद भुरेवार, शरद पाटोळे, मनोज वाघमारे, कैलास पंडित, रतन परदेसी.

मग आठवलेनि उत्तर द्यावे की हे भीमसैनिक कसे शहीद झाले?

बाळ ठाकरेच्या चिथावणीला साथ तितकीच राज ठाकरे ने दिली मराठवाड्यात आंबेडकरी समाजावर हल्ले करण्याचे आदेश राज ठाकरे देत होता , हे सध्या मनसेमध्ये काम करत असलेल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे , अलीकडेच बाळ ठाकरे ने मरण्यापूर्वी एका टि. व्ही. मुलाखतीत एक मोठा खुलासा केला कदाचित सर्व आंबेडकरी लोकांना माहित नसेल पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची सेटलमंट करण्यासाठी रा . सु . गवई ना जेवण्यासाठी बोलावलं आणि विद्यापीठाचे नामांतर न करता हा नामविस्तार करू त्यावर जेवताना रा . सु . गवई लगेच तयार झाले पुढे काय झाल आपल्यालाच माहिती आहे आणि मी कधी नामांतराला विरोध नाहीच केला हि भूमिका बाळ ठाकरे ने मांडली . यावरून काय सिद्ध होते , आंबेडकरी नेत्याची हि लाचारी कि स्वाभिमानी वृत्ती यावर समाजच अधिक विचार करू शकतो या निमित्ताने सांगावे वाटते . याच शिवसेनेने 1974 ला आंबेडकरी नेते भागवत जाधव या आंबेडकरी नेत्याचि हत्या करून
आंबेडकरी समाजात प्रचंड दहशत निर्माण केली त्यानंतरही विदर्भात नवबौद्धावर हल्ले सुरूच ठेवले , कधी दक्षिण भारतीय ,कधी शीख , कधी मुस्लिम तर आंबेडकरी जनतेवर या नराधमानी हल्ले सुरूच ठेवले, या सगळ्या आराजकतेमागे कॉंग्रेस होती आणि शरद पवारांचा वरदहस्त होता म्हणून शिवसेनेने गुंडगिरी निर्माण केली , त्यानंतर “Riddles in Hinduism”. हे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ महाराष्ट्र सरकारने प्रकाशित करू नये यात हिंदू देव देवतांचा अपमान आहे हि भूमिका तेव्हा बाळ ठाकरेनी घेतली होती . त्या वेळी जवळपास ४ महिने वातावरण आंबेडकरी जनता विरुद्ध शिवसेना अस राहीले होते. जानेवारी १९८८ ला निघालेल्या शिवसेनेच्या मोर्चाने लोकांना चिथावणी देऊन जमवल " ज्याच खर रक्त हिंदूच असेल त्यांनी या मोर्चात याव , या मोर्चात बाबासाहेबावर अभद्र शब्दात टिका केली गेली , त्यात आनंद दिघे ह्या शिवसेनेच्या नेत्याने त्यांच्या नेत्यापेक्षा या नराधमाने अकलेचे तारे तोडून बाबासाहेबांच्या आई माता भीमाबाई बद्दल संशयी भाषा वापरून सकपाळ ते आंबेडकर कसे झाले अशा प्रकारचे वक्त्यव्ये करून आंबेडकरी समाजला चिथावले . याचा राग म्हणून ५ फेब्रुवारी १९८८ ला प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृवात मंत्रालयावर मोर्चा काढला आंबेडकरी तरुण आणि शिवसैनिकामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले त्यातच हुतात्मा स्मारकाजवळ आपल्या आंबेडकरी तरुणाकडून स्मारकाची नासधूस झाली , दुसऱ्या दिवशी आताचे नकली ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बाळ ठाकरेच्या आदेशाने चबुतरा गोमुत्राने धार्मिक विधी करून शुद्ध करून मनुवादी विचारसरणीचा परिचय करून दिला .
बाळ ठाकरेच्या आंत्यविधीला आपले सर्व आंबेडकरी नेते होते पण आपल्या सर्व आंबेडकरी नेत्यामध्ये एक आंबेडकरी नेता नव्हता ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर, कोणी म्हणेल की आंत्यविधीला उपस्थित राहाव लागत पण आमच्या बापाचा बाप आसलेले बाबासाहेब आणि आंबेडकरी जनतेवर जुलुम करणार्यांचा आदर इतर आंबेडकरी नेत्यांना आसु शकतो, पण परंतु सख्या बापाच्या रक्ताच्या पोराला, बापाच्या आपमाना बद्दल बाळ ठाकरे सारख्या व्यक्ती बद्दल, कधीच आदर आसु शकत नाही, हे बाळासाहेब आंबेडकरांनी अनुपस्थीत राहून स्वाभीमानी भीमबाणा दाखवुन दिला आहे. आता वेळ आलि आहे आठवल्या सारख्या लाचार पुढार्याना त्यांची जागा दाखवून द्यायची, आसल्या लाचार पुढार्यांनी थोड्यास्या भाकरीच्या टूकड्यासाठी स्वतःहाचा स्वाभिमान घान ठेवला आहे, लाचारा सारखे मनुवाध्यांच्या दाराला जाऊन बसले आहेत , माझ्या सारखा सामान्य भीमसैनिक जातीयवाध्यांनी दिलेल्या या जखमा कधीच विसरणार नाही आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावुन बसणार्याना कधीच माफ करणार नाही.
एक आंबेडकरी कवी म्हणतो

" सांभाळून ठेवा राख जाळलेल्या घरांची, संपली नाही लढाई नामांतर लढ्याची”

म्हणून मिञांनो
मनुवाध्यांना गाढताना ह्या जखमा सदैव आपल्या डोळ्यात राहू द्या.

-@ विकास रोडे

सदरील लेखातील काही मुद्दे Pravin Jadhao सरांच्या लेखातून पण घेतले आहेत.

नामांतर लढ्यातील शहीद झालेल्या सर्व भहाद्दर भीमसैनिकांना माझे विनम्र आभिवादन आणि डॉं बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ, अौरंगाबाद 20 व्या नामविस्तार वर्धापन दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा .

!!! जय भीम !!!

No comments:

Post a Comment