Thursday, 27 March 2014

भीमा कोरेगाव चे युद्ध आम्हास आपल्या महापराक्रमाची आठवण करून देत आहे





भीमा कोरेगाव चे युद्ध आम्हास आपल्या महापराक्रमाची आठवण करून देत आहे...१ जानेवारी १८१८ रोजी इंग्रज आणि दुसरा बाजीराव पेशवा यांच्यात पुण्यातील भीमा नदीच्या तीरावर वसलेल्या कोरेगाव येथे झालेली लढाई आणि या लढाईत महारांनी गाजविलेले शौर्य हि संपूर्ण महार समाजाला अभिमानास्पद अशी घटना आहे.
महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून कोरेगाव भीमा इथं ब्रिटिशांनी विजयस्तंभ बांधला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखो भीमसैनिक या प्रेरणास्थानाला भेट देतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरही दरवर्षी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी यायचे.

१ जानेवारी पर्यत सर्व समाजा पर्यत आपल्या शूर-वीरांचा इतिहास गेलाच पाहिजे.

Share Share Share Share Share Share


भीमा कोरेगाव

भीमा कोरेगाव जिंकण्या
होते किती साथी
पेशवे ब्राम्हण विझले
महारांच्या पेटल्या वाती
नदीकाठी नदीतीरावर
पेश्वांचा केला भंग
ब्रिटिशाही सलाम करती
महारांचा विजयस्तंभ
आले किती अंगावर
मोजायला अंकच नाही
पुन्हा वाट्याला जावू नका
महारांना अंतच नाही
भीमा कोरेगावाची
नाही सांगत खोटी गोष्ट
पुण्याच्या गादीवरती
फक्त महारांचीच पोस्ट

No comments:

Post a Comment